Yamaha Fascino 125 Fi Hybrid 2026 : भारतातील प्रमुख टू-व्हिलर कंपनी Yamaha ने भारतात आपली नवीन स्कूटर Yamaha Fascino 125 Fi Hybrid 2026 लॉन्च केली आहे. या स्कूटरला आधीपेक्षा अधिक स्टायलिश आणि आधुनिक लुक देण्यात आला असून, ही स्कूटर तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असेल.
किंमत आणि व्हेरिएंट्स
कंपनीने ही स्कूटर खालील तीन व्हेरिएंट्समध्ये आणली आहे.
- Fascino Drum - ₹76,500 (एक्स-शोरूम)
- Fascino Disc - ₹88,000
- Fascino S (टॉप व्हेरिएंट) - ₹95,200
या किंमत श्रेणीत ही स्कूटर डिझाइन आणि फीचर्सच्या दृष्टीने एक चांगला पर्याय मानला जात आहे.
नवीन डिझाइन आणि आकर्षक लुक
नवीन Fascino मध्ये यावेळी डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्कूटरला पूर्णपणे नवीन टेल सेक्शन, अपडेटेड टेल लाइट आणि इंडिकेटर्स, तसेच नवीन ग्राफिक्ससह फ्रेश आणि प्रीमियम लुक दिला आहे. हे बदल विशेषतः तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन करण्यात आले असून, स्कूटर अधिक मॉडर्न आणि आकर्षक दिसतेय.
इंजिन आणि मायलेज
या स्कूटरमध्ये 125cc चे एअर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हायब्रिड टेक्नोलॉजीसह Smart Motor Generator (SMG), स्टार्ट-स्टॉप सिस्टममुळे अधिक इंधन बचत होते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर 65 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देऊ शकते.
प्रमुख फीचर्स
या स्कूटरमध्ये साइड स्टँड इंजिन कट-ऑफ (सुरक्षेसाठी), 21 लिटर अंडरसीट स्टोरेज आणि E20 फ्यूल सपोर्ट (भविष्यासाठी तयार) देण्यात आला आहे.
Web Summary : Yamaha launched the Fascino 125 Fi Hybrid 2026 in India. It boasts a stylish design, three variants, and a fuel-efficient 125cc engine with hybrid technology. Claimed mileage is 65 kmpl. Features include side-stand engine cut-off and 21-liter storage.
Web Summary : Yamaha ने भारत में Fascino 125 Fi Hybrid 2026 लॉन्च की। इसमें स्टाइलिश डिज़ाइन, तीन वेरिएंट और हाइब्रिड तकनीक के साथ एक ईंधन-कुशल 125cc इंजन है। 65 kmpl माइलेज का दावा किया गया है। साइड-स्टैंड इंजन कट-ऑफ और 21-लीटर स्टोरेज जैसी सुविधाएं हैं।