TATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:29 PM2021-07-27T16:29:35+5:302021-07-27T16:31:48+5:30

Tata Nexon CNG spotted:  टाटा मोटर्स येत्या 4 ऑगस्टला कार लाँच करणार आहे. परंतू ती कार कोणती असेल यावर अद्याप पडदा टाकलेला आहे. यामुळे ती टियागो सीएनजी किंवा नेक्सॉन सीएनजी असण्याची चर्चा होऊ लागली आहे.

TATA Nexon is also likely to come in CNG; Spotted during testing in Pune | TATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट

TATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट

googlenewsNext

Tata Nexon CNG spotted: एप्रिल महिन्यात टाटा मोटर्सने (Tata Motors) त्यांच्या ताफ्यातील काही कार सीएनजी (CNG) पर्यायातही उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. यानंतर टियागो (Tiago CNG) ही हॅचबॅक कार सीएनजी टेस्टिंग करताना दिसली होती. आता सर्वाधिक खपाची बनलेली आणि पेट्रोल, डिझेलसह इलेक्ट्रीक अवतारात असलेली फाईव्ह स्टार रेटिंगवाली कॉम्पॅक्ट एसयुव्ही नेक्सॉन (Tata Nexon) देखील सीएनजीमध्ये येण्याची शक्यता आहे. (it is possible that Tata Nexon CNG varient will launch soon. )

Maruti CNG Car: मारुतीच्या दोन सीएनजी कार लवकरच लाँच होणार; शानदार मायलेज अन् पैशांची बचत

पुण्याच्या आसपासच्या परिसरात टाटा नेक्सॉन सीएनजीची टेस्टिंग करण्यात येत आहे. यामुळे लवकरच सीएनजी कारमध्ये नेक्सॉनचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. टाटाची टियागो सीएनजीमध्ये दिसल्यानंतर टिग़ॉरदेखील सीएनजीमध्ये येण्याच्या चर्चा होत होत्या. परंतू टाटाने धक्का देत नेक्सॉनही सीएनजीमध्ये उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. 

Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज

टाटा मोटर्स येत्या 4 ऑगस्टला कार लाँच करणार आहे. परंतू ती कार कोणती असेल यावर अद्याप पडदा टाकलेला आहे. यामुळे ती टियागो सीएनजी किंवा नेक्सॉन सीएनजी असण्याची चर्चा होऊ लागली आहे. टाटा मोटर्स मारुती आणि ह्युंदाईला टक्कर देण्यासाठी टियागो, टिगॉर, अल्ट्रॉझ आणि नेक्सॉनचे सीएनजी व्हेरिअंट बाजारात आणण्याची शक्यता आहे. टाटा सध्या देशातील तिसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी बनली आहे. 

Tata Motors च्या या एसयुव्हीला तुफान डिमांड; काही महिन्यांतच 10000 चा आकडा पार

टाटाला मोठा फायदा....
टाटाची नेक्सॉन ही फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगवाली भारतातील पहिली कार आहे. एक अपडेट मिळाल्याने  या कारला मोठी मागणी आहे. तसेच या कारचे इलेक्ट्रीक व्हर्जनही बाजारात आहे. त्यालाही डिझेल कारएवढीच मागणी होऊ लागली आहे. यामुळे सीएनजी पर्याय मिळाला तर मारुती, ह्य़ुंदाईकडे जाणारे ग्राहक नेक्सॉन कडे वळणार आहेत. यामुळे याचा फायदा टाटालाच होणार आहे. 
 

Web Title: TATA Nexon is also likely to come in CNG; Spotted during testing in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.