Maruti CNG Car: मारुतीच्या दोन सीएनजी कार लवकरच लाँच होणार; शानदार मायलेज अन् पैशांची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 03:29 PM2021-07-27T15:29:18+5:302021-07-27T15:29:53+5:30

Maruti CNG Car: सध्यातरी मारुती आणि ह्युंदाईकडे सीएनजीचे पर्याय आहेत. टाटा, फोर्ड या कंपन्या लवकरच सीएनजी कार बाजारात आणतील. परंतू मारुतीचा हात या कंपन्या मिळूनही पकडू शकणार नाहीत. 

Maruti's two CNG cars to be launched soon; good mileage and money saving | Maruti CNG Car: मारुतीच्या दोन सीएनजी कार लवकरच लाँच होणार; शानदार मायलेज अन् पैशांची बचत

Maruti CNG Car: मारुतीच्या दोन सीएनजी कार लवकरच लाँच होणार; शानदार मायलेज अन् पैशांची बचत

googlenewsNext

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी कहर मांडला आहे. यामुळे ग्राहक पर्यायी इंधनाकडे मोठ्या प्रमाणावर वळू लागले आहेत. यामुळे लोकांचा ओढा सीएनजी आणि ईलेक्ट्रीक वाहनांकडे वाढू लागला आहे. यामुळे देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या ताफ्यातील सर्वच गाड्या सीएनजी (CNG) करण्याच्या विचारात आहे. जोवर इलेक्ट्रीक वाहने मुख्य प्रवाहात येत नाहीत तोवर सीएनजी हाच एक पर्याय राहणार आहे. (Maruti suzuki will launch two CNG cars soon.)

यामुळे मारुती लवकरच दोन नव्या कार सीएनजीमध्ये उतरवणार आहे. सध्यातरी मारुती आणि ह्युंदाईकडे सीएनजीचे पर्याय आहेत. टाटा, फोर्ड या कंपन्या लवकरच सीएनजी कार बाजारात आणतील. परंतू मारुतीचा हात या कंपन्या मिळूनही पकडू शकणार नाहीत. 
मारुती सुझुकीने डिझेल मॉडेल बंद केली आहेत. सर्व मॉडेल पेट्रोलमध्येच आणण्याचा निर्णय मारुतीने घेतला होता. यानुसार इग्निसपासून स्विफ्ट, अर्टिगा ते एस-क्रॉसपर्य़ंत साऱ्या गाड्या पेट्रोलमध्ये येत आहेत. यापैकी काही कार सीएनजीमध्ये आहेत. आता आणखी दोन कारची त्यामध्ये भर पडणार आहे. 

Maruti Suzuki Swift CNG मध्ये लाँच केली जाणार आहे. तसेच मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire CNG) देखील सीएनजीमध्ये लाँच केली जाणार आहे. दोन्ही कार टेस्टिंगवेळी दिसल्या आहेत. या दोन्ही गाड्या सीएनजीमध्ये लाँच झाल्यावर मारुतीकडे एकूण 8 सीएनजी कार असणार आहेत. एक अर्टिगा सोडली तर अन्य गाड्या या 30 ते 32 किमी प्रति किलोचे मायलेज देतात. 
 

Web Title: Maruti's two CNG cars to be launched soon; good mileage and money saving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.