Kia च्या 'या' SUV वर ग्राहत तुटून पडले; लाखो लोकंनी खरेदी केली, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:47 IST2026-02-06T17:47:09+5:302026-02-06T17:47:29+5:30
मागणी इतकी...आठ आठवड्यांवर पोहोचला वेटिंग पीरियड!

Kia च्या 'या' SUV वर ग्राहत तुटून पडले; लाखो लोकंनी खरेदी केली, पाहा...
नेक्स्ट जनरेशन Kia Seltos ने भारतीय बाजारात दमदार सुरुवात केली आहे. जानेवारी 2026 पासून विक्री सुरू झालेल्या या मिड-साइज SUV ने पहिल्याच महिन्यात 10,639 युनिट्सची विक्री नोंदवत एकूण विक्रीत 6 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, डिझेल व्हेरिएंटला सर्वाधिक मागणी असून पेट्रोल व्हेरिएंटच्या तुलनेत त्याचा वेटिंग पीरियडही अधिक आहे.
बुकिंग डिसेंबरपासून; डिलिव्हरी जानेवारीत...
नव्या Kia Seltos ची बुकिंग 11 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली होती, तर जानेवारी 2026 च्या मध्यापासून डिलिव्हरी सुरू करण्यात आली. लॉन्चच्या पहिल्याच महिन्यात मिळालेल्या प्रतिसादामुळे किआसाठी ही SUV मोठा यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
Kia Seltos वेटिंग पीरियड किती?
एका ताज्या अहवालानुसार डिझेल व्हेरिएंटसाठी सुमारे 8 आठवड्यांचा वेटिंग पीरियड आहे, तर पेट्रोल व्हेरिएंट (नॅचरलि अॅस्पिरेटेड व टर्बो) साठी 4 ते 5 आठवडे वेटिंग आहे. मात्र, ट्रान्समिशन, रंग आणि शहरानुसार वेटिंग पीरियड बदलू शकतो, त्यामुळे ग्राहकांनी खरेदीपूर्वी जवळच्या डीलरशिपकडून माहिती घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
कोणते रंग सर्वाधिक लोकप्रिय?
अहवालानुसार इम्पिरियल ब्लू, प्यूटर ऑलिव्ह आणि मॅग्मा रेड हे रंग सर्वाधिक मागणीत असून, यासाठी 8 आठवड्यांपर्यंत वाट पाहावी लागू शकते. ऑरोरा ब्लॅक पर्ल आणि ग्लेशियर व्हाइट पर्ल रंगांसाठी सुमारे 6 आठवड्यांचा वेटिंग पीरियड आहे.
कशी आहे नवी Kia Seltos?
नव्या Kia Seltos मध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत
1.5 लिटर नॅचरलि अॅस्पिरेटेड पेट्रोल (115 bhp)
6-स्पीड मॅन्युअल
CVT ऑटोमॅटिक
1.5 लिटर डिझेल (116 bhp)
6-स्पीड मॅन्युअल
6-स्पीड ऑटोमॅटिक
1.5 लिटर टर्बो-पेट्रोल (160 bhp)
6-स्पीड iMT
7-स्पीड DCT
किंमत आणि बाजारातील स्पर्धा
नव्या Kia Seltos ची किंमत 10.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन 19.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. यावेळी X-Line कॉस्मेटिक पॅकेजही मॉडेल लाइनअपमध्ये उपलब्ध आहे. मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये Kia Seltos ला Hyundai Creta, Tata Sierra, Maruti Grand Vitara, Toyota Hyryder, Volkswagen Taigun, Skoda Kushaq, Honda Elevate यांसारख्या लोकप्रिय SUV कडून तगडी स्पर्धा मिळत आहे.