शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:40 IST

फुल टँकमध्ये ही कार 1200Km एवढे मायलेज देईल...

मारुती सुझुकी इंडियाने आता भारतीय बाजारात आपली नवी मिडसाईज व्हिक्टोरिस एसयूव्ही सादर केली आहे. ही एसयूव्ही एकूण 6 ट्रिम्स LXI, VXI, ZXI, ZXI(O), ZXI+ आणि ZXI+(O) मध्ये खरेदी करू शकाल. ही एसयूव्ही मारुती सुझुकी अरेना डीलरशिपच्या माध्यमाने विकली जाईल. २०२३ च्या ग्रँड विटारा नंतर, व्हिक्टोरिस ही कंपनीची दुसरी दावेदार आहे. यामुळे, व्हिक्टोरिसची स्पर्धा, मारुतीच्याच ग्रँड विटारासह ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, एमजी अ‍ॅस्टर, होंडा एलिव्हेटशी असेल.

मारुती व्हिक्टोरिसचे फीचर्स -या एसयूव्हीच्या फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, डॉल्बी अॅटमॉस्टसह 8-स्पीकर साउंड सिस्टिम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अँम्बिएन्ट लायटिंग, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, लेदरेट अपहोल्स्ट्री, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, ८-वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हेड-अप डिस्प्ले, केबिन एअर फिल्टर, पॉवर्ड टेलगेट आणि बरेच काही समाविष्ट आहे.

सेफ्टी फीचर्स -व्हिक्टोरिसच्या सेफ्टी पॅकेजमध्ये, स्टँडर्डच्या स्वरुपात 6 एअरबॅग्स, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, ब्रेक असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि इतरही काही सुविधा देण्यात आल्या आहेत. हिच्या हायर व्हेरिअंटमध्ये 360-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि मारुती मॉडेलमध्ये पहिल्यांदाच लेवल 2 ADAS ही मिळते. याशिवाय, विक्टोरिसला 5-स्टार भारत NCAP क्रॅश सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे.

इंजिन ऑप्शन -व्हिक्टोरिस साधारणपणे ग्रँड व्हिटारा प्रमाणेच आहे. या कारमध्ये 3 मुख्य पॉवरट्रेन ऑप्शन देण्यात आले आहेत. यात, पहिले 103hp पॉवर असलेले 1.5-लिटर, 4-सिलिंडर माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन, दुसरे 116hp पॉवर असलेले 1.5-लिटर, 3-सिलिंडर स्ट्रॉन्ग हायब्रिड सेटअप आणि तिसरे 89hp पॉवर असलेले 1.5-लिटर पेट्रोल-CNG इंजिन असे पर्याय देण्यात आले आहेत. 

महत्वाचे म्हणजे, CNG व्हेरिअंटसाठी 5-स्पीड मॅन्युअल देण्यात आले आहे. व्हिक्टोरिसमध्ये ऑल-व्हील ड्राइव्हचे ऑप्शनही मिळेल. तसेच, फुल टँकमध्ये ही कार 1200Km एवढे मायलेज देईल. याशिवाय इतरही अनेक लक्झरिअस गोष्टींचा या कारमध्ये समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार