Maruti e Vitaraची प्राइस लिस्ट जारी, जाणून घ्या बेस ते टॉप मॉडेलपर्यंतची किंमत; BaaS प्लॅनसह देखील खरेदी करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:57 IST2026-02-19T15:56:39+5:302026-02-19T15:57:19+5:30
सध्या गुजरात प्लांटमध्ये उत्पादन सुरू असून सुरुवातीला डिलिव्हरी मर्यादित असेल. मात्र, जुलै २०२६ नंतर उत्पादनाचा वेग वाढल्यानंतर डिलिव्हरीचा वेटिंग पिरियड कमी होण्याची शक्यता आहे.

Maruti e Vitaraची प्राइस लिस्ट जारी, जाणून घ्या बेस ते टॉप मॉडेलपर्यंतची किंमत; BaaS प्लॅनसह देखील खरेदी करता येणार
maruti e vitara price list released check price of base to top model
मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV Maruti e Vitara ची संपूर्ण प्राइस लिस्ट जारी केली आहे. या SUV चे बेस व्हेरिएंट 'Delta' १५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आले आहे. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन कंपनीने हे मॉडेल वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये सादर केले असून, यामध्ये 'Zeta' व्हेरिएंटची किंमत १७.४९ लाख रुपये, 'Alpha' ची १९.७९ लाख रुपये आणि टॉप मॉडेल 'Alpha Dual-Tone' ची किंमत २०.०१ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
BaaS मॉडेलमध्ये कमी सुरुवातीची किंमत -
मारुती ई विटारा BaaS प्लॅन किंवा बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस प्लॅनसह देखील खरेदी करता येते. या प्लॅन अंतर्गत, ग्राहक वाहनाची सुरुवातीची किंमत कमी देतात आणि बॅटरीसाठी प्रति किलोमिटर भाडे देतात. डेल्टा व्हेरिएंटची BaaS किंमत ₹१०.९९ लाख एढी आहे. यात ३.९९ रुपये प्रति किलोमीटर एवढे बॅटरी भाडे द्यावे लागेल. Zeta वेरिएंट 11.99 लाख रुपयांना आहे. (+ बॅटरी भाडे ४.३९ रुपये/किमी), Alpha १४.२९ लाख रुपये (+ बॅटरी भाडे ४.३९ रुपये/किमी) आणि Alpha ड्यूल-टोन १४.५१ लाख रुपये (+ बॅटरी भाडे ४.३९ रुपये/किमी) मध्ये उपलब्ध आहे. ज्यांची कमी सुरुवातीच्या गुंतवणुकीत इव्ही खरेदी करण्याची इच्छा अेसेल, त्यांच्यासाठी हा प्लॅन फायद्याचा ठरू शकतो.
वारंटी आणि बायबॅक ऑफर
कंपनी या कारसोबत ७.४ किलोवॉटचा AC होम चार्जर आणि त्याचे इन्स्टॉलेशन मोफत देत आहे. सुरक्षेसाठी बॅटरीवर ८ वर्षे किंवा १,६०,००० किमी पर्यंतची वारंटी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, मारुतीने ३ वर्षांसाठी ६०% आणि ४ वर्षांसाठी ५०% बायबॅक गॅरंटी दिली आहे, ज्यामुळे ग्राहकांना भविष्यात ही कार बदलणे सोपे होईल.
डिलिव्हरी कधी सुरू होणार?
सध्या गुजरात प्लांटमध्ये उत्पादन सुरू असून सुरुवातीला डिलिव्हरी मर्यादित असेल. मात्र, जुलै २०२६ नंतर उत्पादनाचा वेग वाढल्यानंतर डिलिव्हरीचा वेटिंग पिरियड कमी होण्याची शक्यता आहे.