७ एअरबॅग्ज आणि २५ नवे बदल! ह्युंदाईची सर्वात सुरक्षित कार Verna 2026 लॉन्च, किंमत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 19:44 IST2026-03-09T19:43:06+5:302026-03-09T19:44:47+5:30

ह्युंदाईने आपली लोकप्रिय सेडान Verna 2026 भारतात लॉन्च केली आहे. २५ हून अधिक नवीन फीचर्स आणि सुरक्षेसाठी तब्बल ७ एअरबॅग्ज... या कारचा लूक आणि पॉवर पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!

Hyundai Verna 2026 Facelift Launched in India: Starts at ₹10.98 Lakh with 7 Airbags and 25+ New Features. | ७ एअरबॅग्ज आणि २५ नवे बदल! ह्युंदाईची सर्वात सुरक्षित कार Verna 2026 लॉन्च, किंमत किती?

७ एअरबॅग्ज आणि २५ नवे बदल! ह्युंदाईची सर्वात सुरक्षित कार Verna 2026 लॉन्च, किंमत किती?

भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी ह्युंदाई मोटर इंडियाने आपली लोकप्रिय प्रीमियम सेडान Verna 2026 मध्ये अनेक बदल करून भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या नवीन कारमध्ये डिझाइन, टेक्नोलॉजी, सेफ्टी फीचर्ससह अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

२०२६ ह्युंदाई व्हेरना एकूण ६ व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. याची एक्स-शोरूम किंमत १०.९८ लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप मॉडेलसाठी १८.२५ लाख रुपयांपर्यंत जाते. ह्युंदाईने या कारला आपली सर्वात सुरक्षित कार म्हटले आहे. यामध्ये ७ एअरबॅग्ज देण्यात आल्या असून कारला ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. कारला अधिक मॉडर्न लूक देण्यासाठी यात ब्लॅक क्रोम रेडिएटर ग्रिल, ड्युअल एलइडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि नवीन डिझाइन केलेले फ्रंट आणि रिअर बंपर देण्यात आले आहेत.

कारमध्ये १६ इंची डायमंड-कट अलॉय व्हील्स मिळतील. ही कार १.५ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन अशा दोन इंजिन पर्यायांसह येते. १.५ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन हे ६-स्पीड मॅन्युअल किंवा IVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते आणि १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन हे १५८ bhp पॉवर आणि २५३ Nm टॉर्क जनरेट करते. हे ६-स्पीड मॅन्युअल किंवा ७-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.

कोणाशी स्पर्धा?

ह्युंदाई व्हेरना २०२६ ची भारतीय बाजारपेठेत होंडा सिटी, स्कोडा स्लाव्हिया आणि फॉक्सवॅगन व्हर्चस यांसारख्या प्रस्थापित कारशी थेट स्पर्धा होणार आहे. मिड-साईज सेडान सेगमेंटमध्ये आपले स्थान पुन्हा निर्माण करण्यासाठी ह्युंदाईने या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि जबरदस्त लूक दिला आहे.

Web Title : हुंडई वेरना 2026: 7 एयरबैग्स, 25 बदलाव, कीमत का खुलासा!

Web Summary : हुंडई ने वेरना 2026 को बेहतर सुरक्षा और डिजाइन के साथ लॉन्च किया। छह वेरिएंट में उपलब्ध, इसमें 7 एयरबैग, अपडेटेड स्टाइलिंग है, और इसकी शुरुआती कीमत ₹10.98 लाख है। इंजन विकल्पों में 1.5L पेट्रोल और टर्बो-पेट्रोल शामिल हैं, जो होंडा सिटी और स्कोडा स्लाविया को चुनौती देते हैं।

Web Title : Hyundai Verna 2026: 7 Airbags, 25 Changes, Price Revealed!

Web Summary : Hyundai launches the Verna 2026 with enhanced safety and design. Available in six variants, it features 7 airbags, updated styling, and starts at ₹10.98 lakh. Engine options include 1.5L petrol and turbo-petrol, challenging Honda City and Skoda Slavia.