Royal Enfield : अवघ्या 2 मिनिटांत लागला  SOLD OUT चा बोर्ड! सर्व बाइक्सची झाली विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 08:23 PM2021-12-07T20:23:56+5:302021-12-07T20:25:36+5:30

Royal Enfield : कंपनीने नुकतीच आपली एक नवीन बाईक लाँच केली आहे, ज्याची बुकिंग ओपन झाल्यानंतर फक्त 2 मिनिटांत विक्रीचा बोर्ड ( Sold Out) लावण्यात आला.

Gone in 120 seconds: Royal Enfield 650 Anniversary Editions sold out in India | Royal Enfield : अवघ्या 2 मिनिटांत लागला  SOLD OUT चा बोर्ड! सर्व बाइक्सची झाली विक्री

Royal Enfield : अवघ्या 2 मिनिटांत लागला  SOLD OUT चा बोर्ड! सर्व बाइक्सची झाली विक्री

Next

नवी दिल्ली : रॉयल एनफिल्डबद्दल (Royal Enfield) लोकांची क्रेझ ही काही नवीन गोष्ट नाही, पण यावेळी असं काही घडलं ज्यामुळे ऑटो क्षेत्रात Royal Enfield बाईकचीच चर्चा सुरु झाली आहे. कंपनीने नुकतीच आपली एक नवीन बाईक लाँच केली आहे, ज्याची बुकिंग ओपन झाल्यानंतर फक्त 2 मिनिटांत विक्रीचा बोर्ड ( Sold Out) लावण्यात आला.

विक्री झालेल्या Twin Anniversary Edition च्या सर्व युनिट Royal Enfield ने अलीकडेच आपली  650 Twin Anniversary Edition लाँच केली होती. संपूर्ण जगासाठी कंपनीने त्याचे फक्त 480 युनिट्स बनवले आहेत. यामध्ये भारतीय बाजारपेठेसाठी फक्त 120 युनिट्स सादर करण्यात आले होते. भारतात बाईकचे 6 डिसेंबर रोजी बुकिंग सुरू होताच, सर्व युनिट्स केवळ 2 मिनिटांत विकले गेले.

Royal Enfield ची 650 Twin Anniversary Edition खास आहे. कंपनीने याला रिच ब्लॅक क्रोम पेंट थीममध्ये सादर केले आहे. यावर हाताने बनवलेला रॉयल एनफिल्ड ब्रास बॅज आहे, जो कंपनीने बाईकच्या टाकीवर लावला आहे.

इसलिए खास है Royal Enfield की ये बाइक

650cc इंजिनचा दमदार परफॉर्मेंस
Royal Enfield 650 Twin Anniversary Edition सामान्य मॉडेल प्रमाणेच 650cc चे इंजिन आहे, जे दमदार परफॉर्मेंस देत आहे.  कंपनीने Royal Enfield ला 120 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही स्पेशल एडिशन लाँच केली आहे. कंपनीने वर्धापनदिन आवृत्तीचे दोन ट्रिम  Royal Enfield Continental GT 650 आणि  nterceptor INT 650  उपलब्ध केले आहेत.

मिळेल एक्स्ट्रा वॉरंटी
कंपनी Royal Enfield या वर्धापन दिनानिमित्त स्पेशल आणि ओरिजिनल अॅक्सेसरीज किट देखील देत आहे. तसेच, 3 वर्षांच्या वॉरंटी व्यतिरिक्त, चौथ्या आणि पाचव्या वर्षांसाठी एक्सटेंडेट वॉरंटीचा ऑप्शन देखील मिळेल.

Web Title: Gone in 120 seconds: Royal Enfield 650 Anniversary Editions sold out in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.