शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी समाजकल्याणचा कारभार ‘प्रभारी’वरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याखेरीज दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची ही जबाबदारी याच विभागावर आहे. असे असले तरी या विभागाला तीन वर्षांपासून कायमस्वरूपी स्वतंत्र अधिकारी न मिळाल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवरच कामकाज सुरू आहे. परिणामी एकाच अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाच्या जबाबदारी दिल्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

ठळक मुद्देयोजना प्रभावित : तीन वर्षांनंतरही मिळेना कायमस्वरूपी अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला साधारणत: तीन वर्षांनंतरही प्रमुख मिळाला नसून अजूनही या विभागाचा कारभार प्रभारी मार्फत सुरू आहे. अधिकारीच नसल्याने मागासवर्गीय बरोबरच दिव्यांगांच्याही योजनांना राबविताना कसरत होत आहे.समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याखेरीज दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची ही जबाबदारी याच विभागावर आहे. असे असले तरी या विभागाला तीन वर्षांपासून कायमस्वरूपी स्वतंत्र अधिकारी न मिळाल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवरच कामकाज सुरू आहे. परिणामी एकाच अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाच्या जबाबदारी दिल्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे समाजकल्याण अधिकाऱ्यांचे रिक्त असलेले पद भरण्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी व समाजकल्याण सभापती सुशिला कुकडे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली नाही. सध्याच्या स्थितीत समाजकल्याण विभागाचा हा प्रभार महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.अगोदरच महिला व बालकल्याण विभागाकडे मेळघाटातील कुपोषण अन्य महत्त्वाच्या योजनांची जबाबदारी सोपविली आहे. असे असताना याठिकाणी मात्र समाजकल्याण विभागाचाही महत्वपूर्ण प्रभार देण्यात आला आहे. एकाच अधिकाºयावर दोन महत्वाच्या विभागाचा कारभार सांभाळावा लागत आहे. जिल्हाभरातील मागासवर्गीय समाजाच्या विविध योजनांवर परिणाम हंोत आहे. त्यामुळे शासनाने किमान आतातरी समाज कल्याण विभागाला कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दिव्यांगांनाही प्रतीक्षामागासवर्गीय तसेच दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाºया महत्त्वपूर्ण योजनांसाठी नियमित अधिकारी कधी मिळणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. विविध योजनांचा लांब देण्यासाठी याठिकाणी दिव्यांगानाही कायमस्वरूपी अधिकाºयाची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यादृष्टिने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आहे.राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकाºयांचे रिक्त पद भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. अशातच आता नवीन सरकार आल्यामुळे समाजकल्याण अधिकाºयांचे पद भरण्यासाठी शासनाकडे स्वत: पुन्हा पाठपुरावा करू.- सुशिला कुकडे,सभापती,समाजकल्याण समिती

टॅग्स :zpजिल्हा परिषद