दलित वस्ती सुधारणेसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा

By Admin | Updated: September 21, 2015 00:11 IST2015-09-21T00:11:01+5:302015-09-21T00:11:01+5:30

तेरावा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तळेगाव दशासर येथील प्रस्तावित सिमेंट क्राँकीट नाली व रस्ते बांधकाम..

Youth should take the initiative to improve the Dalit settlement | दलित वस्ती सुधारणेसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा

दलित वस्ती सुधारणेसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा

पालकमंत्र्यांचे आवाहन : कचरा व्यवस्थापन गरजेचे
चांदूररेल्वे : तेरावा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तळेगाव दशासर येथील प्रस्तावित सिमेंट क्राँकीट नाली व रस्ते बांधकाम तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंगणवाडी भवन आदी विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले. या बांधकामासाठी राज्य शासनामार्फत ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी श्री गुरुदेव मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, माजी आ. अरुण अडसड, पंचायत समितीचे सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, जि.प. सदस्य मोहन घुसळीकर, पं.स. सदस्य प्रिती ढोबळे, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, बीडीओ के.आर. कलोडे, सरपंच मनोज बानोडे, अ.बशीर शे. हुसेन आदी उपस्थित होते.ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रत्येकाने कचऱ्याचे व्यवस्थापन व सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Youth should take the initiative to improve the Dalit settlement