शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी पायीच का निघाले अमरावतीहून धारणीकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:45 IST

वसतिगृहात प्रवेशाचा तिढा सुटला नाही : अमरावतीच्या अपर आयुक्त कार्यालयावरही दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती :अमरावती शहरात शिक्षण घेत असलेल्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी धारणीस्थित एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे पायी कूच केले आहे. बुधवारी ते धारणीत दाखल होतील, असा अंदाज आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांनी अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात धडक देत समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र, येथे तोडगा निघाला नसल्याचे हे विद्यार्थी धारणीकडे निघाले, हे विशेष.

धारणीच्या दिशेने निघालेल्या पायी वारीत युवकांसह युवतींचाही समावेश आहे. अमरावती येथील शासकीय वसतिगृहात प्रवेशाचा मुद्दा गंभीर स्वरूपाचा असल्याचे तक्रारीत नमूद आहे. वसतिगृहाचे अधीक्षक हजर राहत नाहीत. विद्यार्थ्यांची कामे वेळेवर होत नसून कर्मचारी त्रास देत असल्याची ओरड आहे. डीबीटीसह संगणक, टेबल खुर्ची मिळावे, स्पर्धा परीक्षा पुस्तके, ड्रेस कोड असावा, वाचनालय सुरू करणे, आदिवासी मुलांचे शासकीय इमारतीचे बांधकाम लवकर सुरू करणे, वसतिगृहात रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात, वसतिगृहात नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने अबरार सोलकर, शंकर इवनाथे, रवी गव्हाळे, सौरभ सुरतने आदी विद्यार्थी पायीच धारणीकडे निघाले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अनेक आदिवासी, तसेच गैरआदिवासी नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

"मंगळवारी विद्यार्थी वसतिगृहाच्या 'स्पॉट अॅडमिशन'साठी आले होते. मात्र, त्यांना एक दिवस थांबा असे सांगण्यात आले. बुधवारी सकाळी धारणीची चमू बोलावून त्यावर तोडगा काढण्याचा शब्द दिला. मात्र, हे विद्यार्थी आताच तोडगा काढा यावर अडून होते. कारण प्रवेशाचा विषय हा धारणी प्रकल्प अधिकारी अधिनस्थ आहे. एक दिवस थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण त्यांनी ऐकले नाही."- जितेंद्र चौधरी, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ