शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आग लागली तर विझवायची कुणी ?

By admin | Updated: February 17, 2015 00:54 IST

महानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या आपातकालीन, संकटाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका अग्निशमन (फायर) विभागात मणुष्यबळाची वानवा आहे

गणेश वासनिक ल्ल अमरावतीमहानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या आपातकालीन, संकटाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका अग्निशमन (फायर) विभागात मणुष्यबळाची वानवा आहे. यंत्रे आहेत पण संचालक नाहीत, अशी स्थिती असल्याने आग लागली तर विझवायची कुणी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अग्निशमन दलात ७५ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता असून तोंडावरच असलेल्या उन्हाळ्यात ही समस्या जिवघेणीही ठरु शकेल. हल्ली ११ वाहने हाताळण्यासाठी साधारणत: १२६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज असली तरी उपलब्ध मनुष्यबळ केवळ ३७ आहे.अतिशय महत्त्वाची सेवा म्हणून अग्निशमन विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या विभागात साहित्य सामग्री, वाहने, यंत्रे खरदी करण्यासाठी शासन विशेष अनुदान सुद्धा देते. मात्र, मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने संकटकालीन परिस्थिती हाताळताना ‘फायर’ विभागाची दमझाक होते. महापालिका प्रशासनाचा आस्थापना खर्च ५६ टक्क्याच्या वर पोहचला आहे. नवीन भरतीला परवानगी देत नाही. परंतु या विभागाचा कारभार मणुष्याबळ अभावी कसा चालवावा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत सूर्य आग ओकू लागणार असून महानगर किंवा लगतच्या गावांमध्ये आग लागण्याचा घटना लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करताना मणुष्यबळाची कमतरता ही मुख्य समस्या ‘फायर’ मध्ये निर्माण झाली आहे. अति महत्त्वपूर्ण सेवेचा दर्जा असलेल्या अग्निशमन विभागात विशेष बाब म्हणून चालक, फायरमनही भरती प्रक्रिया राबवावी, असा प्रस्ताव फायर विभाग प्रमुख भारतसिंह चव्हाण यांनी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला आहे.