शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींची संपत्ती पाण्यात

By admin | Updated: July 28, 2014 23:18 IST

पूर्णा प्रकल्पातून अवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तसेच चारघड धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शेती, संत्राबागा व घरांची मोठी हानी झाली.

चांदूरबाजार तालुक्यात पूर्णेचा कहर : शेती, संत्राबागा, घरे जमीनदोस्तचांदूरबाजार : पूर्णा प्रकल्पातून अवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तसेच चारघड धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शेती, संत्राबागा व घरांची मोठी हानी झाली. यात विध्वंसक प्रलयात सुमारे १०० कोटींची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूर्णेच्या प्रलयाचा सर्वाधिक फटका ब्राह्मणवाडा थडी या गावाला बसला. या एकट्या गावातील ३० कोटींवर संपत्तीचे नुकसान झाले आहे. यात नदीकाठची शेती, बागा पूूर्णत: वाहून गेल्या. तर घरांची मोठी हानी झाली. यात स्वप्नील वांगे नामक १८ वर्षीय युवकाला जीव गमवावा लागला. याशिवाय देऊरवाडा, काजळी, पिंप्री, थूगाव, कुरळ, राजना पूर्णा, टाकरखेडा पूर्णास, धानोरा, सर्फाबाद, आसेगाव, घाटलाकी, बेलमंडळी, यांसह नदीकाठच्या अन्य गावांना मोठा फटका बसला आहे. या प्रलयामध्ये मोठ्या प्रमाणात घरातील भांडी, आलमाऱ्या, गॅस सिलिंडरसह संपूर्ण घरच उद्ध्वस्त होऊन नाहिसे झाल्याचे चित्र या गावात दिसले. यात गाई, म्हशीसुध्दा वाहून गेल्या. हे सर्व नष्टचर्य सुरू असताना प्रशासन मात्र उदासीन होते. गावकरी प्रशासनावर ताशेरे ओढत आहेत. धरणातून पाणी सोडण्याआधी प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. या पुरात नदीकाठची शेते नष्ट झाल्याने बहुतेक ग्रामस्थांना आताच भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. संपूर्ण घरच उद्ध्वस्त झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. या संकटाचा आढावा घेण्यासाठी सध्या तालुक्यात लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सभापतींचे व अधिकाऱ्यांचे दौरे सुरू आहेत. (तालुका प्रतिनिधी)