शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाडोत्री गुंडांना गावकऱ्यांनी पिटाळले

By admin | Updated: October 7, 2014 23:26 IST

सांडपाण्याच्या क्षुल्लक वादाचे उट्टे काढण्यासाठी भाडोत्री गुंडांच्या मदतीने एका कुटुंबाने शेजारील कुटुंबावर हल्ला केला. यात मध्यस्थी करणारे तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती गावकऱ्यांना

सांडपाण्याचा वाद : आठ हल्लेखोरांसह तीन गावकरी जखमीचांदूरबाजार : सांडपाण्याच्या क्षुल्लक वादाचे उट्टे काढण्यासाठी भाडोत्री गुंडांच्या मदतीने एका कुटुंबाने शेजारील कुटुंबावर हल्ला केला. यात मध्यस्थी करणारे तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच एकजूट करून गावकऱ्यांनी या गुंडांना पिटाळून लावले. यात आठ भाडोत्री गुंड जखमी झालेत. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान कुरळपूर्णा येथे घडली. येथील वॉर्ड क्र.१ मध्ये शे. नईम त्यांची पत्नी शबाना अंजुुम व बहिणीसोबत राहतो. त्याच्या शेजारीच पत्नीची मोठी बहीण शकीला परवीनचे घर आहे. या दोन्ही कुटुंबात रस्त्यावरील नालीच्या सांडपाण्याच्या कारणावरून वाद सुरू होता. मंगळवारी दुपारी १ वाजता शे. नईमचे तोंडगाव येथील सासुरवाडीतील मंडळी अचानक कुरळपूर्णा येथे धडकली. लगेच अमरावती येथील लालखडी भागातील सासुरवाडीतील अन्य नातलगदेखील लाल रंगाच्या सुमो एमएच २१-सी-२१४३ या गाडीने कुरळपूर्णा येथे पोहोचले. या सर्व नातलगांनी शेख नईम यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दोन कुटुंबातील भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शे. जाकीर शे. बशीर (२३),अ. कलाम शे.हमीद (३४), शे.मुबीन शे. सत्तार(३२ सर्व रा. कुरळपूर्णा) यांच्यावर चाकुने हल्ला चढविला. यात तिघेही गंभीर जखमी झाले. शेख नईम यांच्या घरावर बाहेरून आलेल्या २० ते २५ जणांनी हल्ला चढविल्याची वार्ता गावात पसरताच गावकरी एकत्र आले. ग्रामस्थांनी एकजूूट करून हल्लेखोरांना पळवून लावले. शेवटी हल्लेखोर जंगलाने पळू लागले. गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. गावकऱ्यांच्या मारहाणीत दुल्लेखाँ मियाखाँ (६०), हाफीजखाँ दुलेखाँ(३०), रियाज खाँ दुलेखाँ, मोहसीन खाँ दुलेखाँ (३० रा. लालखडी, अमरावती) व अ. शकील अ. कदीर (३२ रा. तोंडगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यातील १५ आरोपी अद्यापही फरार आहेत. घटनेची माहिती चांदूरबाजार पोलिसांना कळताच घटनास्थळी धाव घेऊन १२ जणांविरुध्द भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)