शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गावविकास आराखडा, मंजुरीच्या मुद्यावर घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ८० टक्के आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी १० टक्के निधीचा वाटा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील जवळपास ५२६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : आमसभेत सर्वानुमते ठराव पारित, शासनाकडे पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ८० टक्के निधीचा वाटा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, सदर निधीतन गावविकास आराखड्यात समाविष्ट विकासकामे केली जाणार आहेत. सध्या ग्रामपंचायतींवर ग्रामसेवक आणि प्रशासक नेमले आहेत. त्यामुळे वरील निधीतून विकासकामे करताना कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावा, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून गावपातळीवरील विकास आराखडा मंजुरीचा अधिकार जिल्हा परिषदेला द्यावा, असा प्रस्ताव जयंत देशमुख यांनी मांडला. त्यानुसार सदर ठराव आमसभेत एकमताने पारित करून तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ८० टक्के आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी १० टक्के निधीचा वाटा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील जवळपास ५२६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. परिणामी सर्व ग्रापंचायतींचा कारभार ग्रामसेवक आणि प्रशासक या दोन्ही कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या भरोशावर सुरू आहे. अशातच आता ग्रामविकास विभागाने १५ व्या वित्त आयोगाचा पहिला हप्त्याचा निधी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिला आहे.गाव विकासाचे दीडपट नियोजन केले आहे. मात्र, यात गावस्तरावर कुठली कामे निकडीचे आहेत, कुठली नंतर केली जाऊ शकतात. याप्रमाणे कामे होणे अपेक्षित आहे. परंतु एकाच प्रशासकाकडे ५ ते ७ गावांचा कारभार असल्याने गावाविकासाच्या कामात गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावविकास आराखडा मंजुरीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या सभागृहाला देण्यात यावे, अशा आशयाचा प्रस्ताव माजी सभापती जयंत देशमुख यांनी मांडला. या प्रस्तावास जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी मंजुरी देत सभागृहात उपस्थित पदाधिकारी व सदस्यांच्या संमतीने हा ठराव एकमताने पारित केला आहे. सदर ठराव अंतिम निर्णयासाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे.शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द कराशेतात फवारणी करताना शेतकरी व शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर फवारणीदरम्यान शेतमजुरांना सुरक्षा किट पुरविण्याची जबाबदारी शेतमालकांवर टाकण्याचा अध्यादेश तत्कालीन सरकारने पारित करू न फवारणी करताना शेतमजुराचा विषबाधेतून मृत्यू झाल्यास संबंधित शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अध्यादेश रद्द करण्याचा ठराव सदस्य प्रकाश साबळे यांनी मांडला.

टॅग्स :zpजिल्हा परिषद