शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

विजय देशमुख यांना ‘जल बचत शेतकरी’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मेक्सिकोमध्ये होणार पुरस्कार वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 17:15 IST

डॉ. शरद देशमुख पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष विजय देशमुख यांची आंतरराष्ट्रीय सिंचन आयोग दिल्लीद्वारे ‘जलबचत शेतकरी’पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

वरूड (अमरावती), दि. 18  : डॉ. शरद देशमुख पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष विजय देशमुख यांची आंतरराष्ट्रीय सिंचन आयोग दिल्लीद्वारे ‘जलबचत शेतकरी’पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार त्यांना १० आॅक्टोबर रोजी मेक्सिको येथे आयोजित सोहळ्यात दिला जाईल. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख दोन हजार अमेरिकन डॉलर (१ लाख ४० हजार रुपये) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वरूड येथील डॉ.शरद देशमुख पाणीवापर संस्था ही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिलीच संस्था आहे, हे येथे उल्लेखनीय. 

ड्रायझोनमधील वरूड तालुक्यातील डॉ. शरद देशमुख पाणीवापर संस्थेला यापूर्वी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन २००६ साली स्थापन करण्यात आलेल्या या पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील १०७ शेतकरी १६१ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळत आहेत. मागील अनेक वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील नागठाणा प्रकल्पातून पाण्याचा ऊपसा करून सिंचनाचे नियोजन शेतकरी करीत आहेत. पाण्याचा उपसा करण्यासाठी ‘सायफन’ पद्धतीचा वापर केला जात असल्याने वेळेसह पाण्याचीदेखील बचत होत आहे.

शून्य ऊर्जेवर चालणारा हा विदर्भातील एकमेव प्रकल्प आहे. तालुक्यातील रवाळा, तिवसाघाट, शेंदूरजनाघाट, पिंपळशेंडा, वाई, आंतरखोप, वरुड भाग १ आणि भाग २ या शिवारापर्यंत शून्य ऊर्जेवर पाणी पोहोचविण्यात संस्थेला यश आले आहे. विशेष म्हणजे शुद्धीकरणाची सोय असल्याने कचराविरहित पाणी सिंचनासाठी वापरले जाते. लवकरच ‘पाईप टर्बाईन’लावून वीजनिर्मिती करण्याचा मानस पाणीवापर संस्थेने  केला आहे.