शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

देशीसाठी दोन तर, विदेशीसाठी पाच रूपयांचा परवाना आवश्यक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

देशी दारू सेवन करण्यासाठी दाेन रुपये, विदेशी दारूसाठी पाच रुपयांचा दरदिवशी परवाना आवश्यक आहे. या नियमांचे कोणीही मद्य विक्रेता पालन करीत नाही. जिल्ह्यात देशी दारू १५२, विदेशी दारू ३२, बियर बार ३५०, तर बिअर शॉपीची ४५ दुकाने आहेत. यापैकी एकाही मद्य विक्री दुकानात  मद्य सेवन परवाना विचारत नाही. मात्र, मद्य विक्रेत्यांकडे मद्य सेवन परवाना रेकॉर्ड नीट ठेवला जातो. परवानाचे शुल्कही एक्साईजकडे भरले जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार  दुकानातून मद्य खरेदी करताना मद्य सेवन परवाना आवश्यक आहे. मात्र, शहर, ग्रामीण अशा दोन्ही भागात मद्य विक्रेत्यांकडून नियमावली गुंडाळून दारू विक्री केली जात आहे. देशीसाठी दोन तर, विदेशीसाठी पाच रुपयांचा परवानाशिवाय मद्य विक्री राजरोसपणे सुरू आहे. हा प्रकार म्हणजे राज्य शासनाचे उत्पन्न बुडविणारा ठरत आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या मद्य विक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्य विक्रेते या नियमांवलीचे पालन करीत नाही, हे वास्तव आहे. यात वाईन शॉप, देशी दारू अथवा बियर बारचे संचालक कोणत्याही ग्राहकाला मद्य सेवन परवाना असल्याबाबत विचारणा करीत नाही. कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे. खरे तर देशी दारू सेवन करण्यासाठी दाेन रुपये, विदेशी दारूसाठी पाच रुपयांचा दरदिवशी परवाना आवश्यक आहे. या नियमांचे कोणीही मद्य विक्रेता पालन करीत नाही. जिल्ह्यात देशी दारू १५२, विदेशी दारू ३२, बियर बार ३५०, तर बिअर शॉपीची ४५ दुकाने आहेत. यापैकी एकाही मद्य विक्री दुकानात  मद्य सेवन परवाना विचारत नाही. मात्र, मद्य विक्रेत्यांकडे मद्य सेवन परवाना रेकॉर्ड नीट ठेवला जातो. परवानाचे शुल्कही एक्साईजकडे भरले जातात.

परवाना असेल तरच मद्य नियमांचा फज्जा- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमावलीनुसार मद्य सेवन करण्यासाठी परवाना आवश्यक आहे. मात्र, परवाना असेल तरच मद्य अशा प्रकाराचे फलक लावण्याची सक्ती नाही.- मद्य विक्रेेत्यांकडून दारू विक्रीच्या तुलनेत मद्य सेवन परवाना रेकॉर्ड व्यवस्थित ठेवतात. त्यानुसार दुकानात एक्साईज निरीक्षक तपासणीला आले की मद्य विक्री आणि सेवन करण्याचा परवान्याचा ताळमेळ जुळविला जातो.

ना दुकानावर फलकना परवान्याची विचारपूसलहान मुले, महिलांना मिळते दारूशहरातील काही मद्य विक्री दुकानात परवाना न विचारता लहान मुलांसह महिलांनाही बिनदिक्कतपणे दारू दिली जाते. कुणीही यावे पैसे द्यावे आणि मद्य घ्यावे, असा प्रकार निदर्शनास आला आहे.परवानाचे फलक कुठेही नाहीअमरावती, बडनेरा शहरातील कोणत्याही मद्य विक्री दुकानात मद्या सेवन करण्यासाठी परवाना लागेल, अशा आशयाचे फलक लावण्यात आले नाही. सकाळी १० वाजतापूर्वीच मद्य विक्री दुकानांसमोर जणू यात्रा हे चित्र नियमित आहे.

१०० रुपयात वर्षभर, तर हजार रुपयात आजीवन परवानामद्य सेवन करण्याचा परवाना ऑनलाईन देण्याची सुविधा आहे. त्याकरिता आधार कार्ड आवश्यक असून, १०० रुपयांत वर्षभर आणि एक हजारात मद्य सेवनाचा आजीवन परवाना दिला जातो. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदी