शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या इंजेक्शनमुळे आदिवासी मुलगा गंभीर

By admin | Updated: September 28, 2015 00:26 IST

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात बोगस डॉक्टरांना सुगीचे दिवस आले आहेत.

युनानी डॉक्टरचा प्रताप : उपजिल्हा रूग्णालय संशयाच्या भोवऱ्यातधारणी : तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात बोगस डॉक्टरांना सुगीचे दिवस आले आहेत. एका दहा वर्षिय आदिवासी बालकाला येथील एका युनानी डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन टोचल्याने या बालकाची प्रकृती गंभीर झाली आहे. या प्रकरणात उपजिल्हा रूग्णालयाची भूमिकादेखील संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. या घटनेसाठी जबाबदार युनानी डॉक्टरचे नाव शेख असे आहे. मनमोहन सूरजलाल जावरकर असे गंभीर अवस्थेतील मुलाचे नाव असून त्याला २२ सप्टेंबर रोजी उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणात आरोग्य विभागासह अनेकांनी हात ओले केल्याची चर्चा आहे. धारणी शहरात मध्यप्रदेशातून काही युनानी डॉक्टरांनी पोस्ट आॅफीस ते पेट्रोलपंप रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. या दुकानवजा दवाखान्याला लागूनच मेडिकलची दुकानेही थाटली गेली आहेत. या डॉक्टरांकडे अधिकृतरीत्या अ‍ॅलोपॅथी उपचार करण्याची डिग्री नसताना त्यांनी सर्रास दवाखान्यात इंजेक्शन व सलाई देण्याचा प्रकार सुरू केला आहे. अशातच लगतच्या तलई येथील इयत्ता चौथीत शिकणारा मनमोहन सूरजलाल जावरकर याला ताप आल्याने त्याला युनानी डॉक्टर शेखकडे आणण्यात आले. त्या डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिले. त्यानंतर लगेच त्याच्या कमरेवर मोठी गाठ आली. पाहता-पाहता त्याचे शरीर सुजून गेले. यानंतर त्या डॉक्टरने आदिवासी मुलाला उपजिल्हा रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. २२ सप्टेंबर रोजी त्याला उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्याची प्रकृती गंंभीर असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)