शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून १२ रुपयांत दोन लाखांचा विमा

By admin | Updated: May 9, 2015 00:21 IST

पंतप्रधान जीवनज्योती तसेच सुरक्षा विमा योजनेचे शनिवार ९ मे रोजी लोकार्पण होत आहे. केंद्र शासनाच्या या ..

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना : जिल्ह्यात १३ लाख नागरिकांना मिळणार लाभअमरावती : पंतप्रधान जीवनज्योती तसेच सुरक्षा विमा योजनेचे शनिवार ९ मे रोजी लोकार्पण होत आहे. केंद्र शासनाच्या या योजनेत एका वर्षासाठी १२ रुपयांमध्ये दोन लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळणार यासाठी वयाची १८ ते ७० ही कालमर्यादा आहे. जिल्ह्यातील १९ बँकांना याबाबत खातेदार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात किमान १२ ते १३ लाख नगारिकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने बँकांच्या मदतीने विमा योजना सुरु केली आहे. याच योजनेअंतर्गत ३३० रुपयांमध्ये एक वर्षाचा विमा देण्याची योजना आहे यामध्ये ज्यांचे वय १८ ते ५० वर्षे आहे. अशा सर्व बचत खातेदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच खातेदारांच्या पश्चात कुटुंबीयांना विमा रक्कम मिळणार आहे.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक प्रीमियम फक्त १२ रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा अपघात विमा आहे. सर्व बचत बँक खातेधारकांसाठी ही योजना आहे. विम्यात अपघातामुळे येणाऱ्या कायमस्वरुपी अपंगात्वाचाही समावेश करण्यात आला आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरदेखील दोन लाख रुपये मिळणार आहेत. यासाठीदेखील वयोमर्यादा १८ ते ७० आहे. दुसऱ्या योजनेत ३३ रुपयांमध्ये आजारपणात मृत्यू झाल्यास चार लाख रुपयांची मदत केंद्र शासनाकडून मिळणार आहे.१७ बँकांना दिले उद्दिष्टसर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा कवच मिळावे यासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरु केली आहे. यासाठी जिल्ह्यातील १७ बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ असा विम्याचा कालावधी राहणार आहे. यासाठी सर्वच बँकांनी पुढाकार घेतला आहे. बँकाद्वारा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील किमान १२ लाख नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात शनिवारी लोकार्पणअटल पेंशन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे खा. आनंदराव अडसूळ, आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सेंट्रल बँकेद्वारा नोंदणी शिबिरया विमा योजनांकरिता सेंट्रल बँकेद्वारा शहरात नोंदणी शिबिर घेण्यात आले. यावेळी योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली. प्रत्येक नागरिकांनी बचत खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन सहायक महाप्रबंधक संजय देवरस व अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक ए.बी. खोरगडे यांनी केले.