शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वाघांचे सह्याद्रीत होणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 17:09 IST

आता विदर्भातून आठ वाघ स्थलांतर होणार असल्याने सह्याद्रीच्या वन्यसंपदेत भर पडेल, यात दुमत नाही.

ठळक मुद्देकेंद्र शासनाकडे प्रस्तावताडोबा येथील आठ वाघ पाठविण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानव- वन्यजीव संघर्षाची पार्श्वभूमी बघता विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्री अभयारण्यात स्थलांतर केले जाणार आहेत. त्यानुसार राज्याच्या वनविभागाने प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. यासंदर्भात वनमंत्री संजय राठोड यांच्याशी वनविभागाने चर्चा केली.विदर्भात वाघांची संख्या वाढत चालली आहे. विशेषत: पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त वाघ असल्याने त्यांना संचारासाठी जंगलक्षेत्र अपुरे पडत आहे. परिणामी मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी उडत आहे. विदर्भातील वाघ हे उष्ण कटिबंधीय प्रदेशातील असून, त्यांना दऱ्या, डोंगराची सवय नाही. त्यातुलनेत सह्याद्री अभयारण्य हे थंड प्रदेशातील आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर असा मोठा भाग मुंबई पश्चिम वन्यजीव विभागाशी जोडण्यात आला आहे. भौगलिकदृष्ट्या दऱ्या, खोऱ्यांनी वेढलेला असून, हल्ली सह्याद्रीत पाच ते आठ वाघ असल्याची नोंद आहे. १५०० चौरस किमीचा हा प्रदेश निसर्गरम्य वातावरणाने नटलेल्या आहे. आता विदर्भातून आठ वाघ स्थलांतर होणार असल्याने सह्याद्रीच्या वन्यसंपदेत भर पडेल, यात दुमत नाही. सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करण्यापूर्वी त्या भागातील गावांच्या ग्रामपंचायतींची ना-हरकत घ्यावी लागणार आहे. प्रक्रिया फार किचकट असल्याने सहजतेने वाघांचे स्थलांतर करणे सोपे नाही, अशी वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.तीन ते पाच वर्षाचे वाघ स्थलांतरणाची प्रक्रियाविदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात हल्ली क्षमतेपेक्षा जास्त ५० वाघ असल्याची माहिती आहे. त्यामुळे सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करताना ३ ते ५ वयोगटातील वाघांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. प्रथम एक किंवा दोन वाघ सह्याद्रीत स्थलांतर केल्यानंतर त्यांचे मॉनिटरिंग करण्यात येईल. हे वाघ सह्याद्रीत रमले की नाही, या निरीक्षणाअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.वनसचिव मुख्यमंत्र्यांना देणार प्रस्तावविदर्भातील वाघांचे स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव वनसचिव हे राज्य वन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविला जाणार आहे. त्यापश्चात व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्णत्वास येईल. सर्वोच्च न्यायालयालासुद्धा वाघांच्या स्थलांतरणाची माहिती द्यावी लागणार आहे.

वनमंत्र्यांशी वाघांच्या स्थलांतरणाबाबत चर्चा झालेली आहे. राज्य वन मंडळात याविषयी लवकरच मंथन होणार आहे. वाघांच्या स्थलांतरणासाठी अन्य पर्यायदेखील आहेत.- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), नागपूर.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव