शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची आता खैर नाही !

By admin | Updated: October 29, 2015 00:29 IST

शहरातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता रात्रीची गस्त वाढविण्यासोबतच सर्वाधिक चोऱ्या झालेल्या...

सीपींचे प्रभावी पाऊल : फिक्स पाँइंट, पोलिसांची गस्त वाढविलीअमरावती : शहरातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता रात्रीची गस्त वाढविण्यासोबतच सर्वाधिक चोऱ्या झालेल्या परिसरात ‘फिक्स पॉइंट’ लावण्याचा निर्णय पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी घेतला आहे. आयुक्तांच्या या निर्णयाने चोरट्यांची खैर नसल्याचे दिसून येते. अलीकडच्या काळात शहरात दररोज चार ते पाच घरफोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. यातील सर्वाधिक चोऱ्या या राजापेठ व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस नवरात्रौत्सवाच्या बंदोबस्तात तैनात असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे होते. मात्र, आता नवरात्रौत्सव संपल्यामुळे पोलिसांनी चोरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पोलीस आयुक्तांनी चार्ली कमान्डो व्यतिरिक्त विभागीय पेट्रोलिंग, पोलीस ठाण्यांचे पेट्रोलिंग आणि गुन्हे शाखेकडून विशेष पेट्रोलिंग वाढविले आहे. तसेच ‘सीआर’ मोबाईल वाहने सुध्दा पेट्रोलिंगसाठी सज्ज राहणार आहेत. राजापेठ, गाडगेनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून फे्रजरपुरा व कोतवाली ठाण्याच्या हद्दीतही चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस मुख्यालयातील अतिरिक्त पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. याशिवाय शहरातील १० ‘सीआर’ मोबाईल वाहनापैकी ८ वाहने केवळ चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्तीवर राहणार आहेत. बडनेरा आणि नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीसाठी प्रत्येकी एक ‘सीआर’ मोबाईल वाहन देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)