शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचा गलथान कारभार

By admin | Updated: September 28, 2015 00:23 IST

घुइखेड गावात तीन ते चार महिन्यांपासून भुरट्या चोराची टोळी सक्रिय झाली आहे. दिवसागणिक चोरीच्या घटना घडत असून अद्यापही तळेगाव दशासर पोलिसांना चोराचा तपास लागला नाही.

टोळी सक्रिय : एकाच रात्र तीन चोरी, दोन लाखांचा ऐवज लंपासघुईखेड : घुइखेड गावात तीन ते चार महिन्यांपासून भुरट्या चोराची टोळी सक्रिय झाली आहे. दिवसागणिक चोरीच्या घटना घडत असून अद्यापही तळेगाव दशासर पोलिसांना चोराचा तपास लागला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन सुस्त असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होत आहे.घुइखेड गावात अनेक दिवसांपासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटना दिवसागणिक घडत आहेत. २ सप्टेंबर २०१५ रात्री तीन घरी चोरीच्या घटना घडली असून दोन लाख रुपयाचा मालाचा ऐवज लंपास केला आहे. श्रीकृष्ण रामदास मेश्राम यांच्या घराचा दरवाजा तोडून ३० ग्रॅम सोने, ५ ग्रॅम चांदीचे सिक्के नगदी रक्कमेची चोरी झाली. तसेच शेख अनिस खा हमीद खा (केलेवाले) यांच्या घरुन लोखंडी पेटीत ठेवलेले दीड लाख रुपये व लावा कंपनीचा मोबाइल चोरीस गेला तर शिवदास बनसोड यांचे घर ही फोडले विशेष म्हणजे श्रीकृष्ण मेश्राम यांच्या घरी तीन महिन्यांअगोदारही चोरीचा प्रयत्न झाला होता. तसेच मागील महिन्यात ३ पानटपरीचे शटर तोडून नगदी रुपये व साहित्याची चोरी झाली होती. त्याचा तपासही थंड बस्त्यात असल्योन तळेगाव पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण झाले आहे. परत कालच रात्री खारोगळ नाल्याजवळील डी.पी. तील अंदाजे १०० लीटर आॅईल चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.घुइखेड हे गाव चांदूर रेल्वे तालुक्यातील मोठे गाव असून या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. तसेच घुइखेड धामक ही गावे संवेदनशील समजली जातात घुइखेड येथे असलेली पोलिस चौकी मागील अनेक वर्षांपासून बंद असल्याने अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तीला ऊत आल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावात चोरीच्या घटना घडत असून अद्यापपर्यंतही तळेगाव पोलिसांना चोराचा शोध घेता आला नसल्याने पोलिस सुस्त चोर मस्त असल्याची चर्चा गावकऱ्यामध्ये होत होत आहे. नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर कुठलीही अवैध वाहतूक होऊ नये म्हणून देवगाव चौकीवर वाहतूक नियंत्रण चौकी देण्यात आली आहे. परंतू या चौकीचा ही काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)