मेळघाटात लॉकडाऊनमध्ये घुबडांना 'टॅगिंग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:01:40+5:30

लॉकडाऊनमध्ये जंगलात कुणालाही जाण्यास मनाई होती. वन व वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून तसे आदेश निर्गमित आहेत. जंगलबंदी असतानाही एप्रिल महिन्यात ठिपकेवाला पिंगळा या प्रजातीतील सहा घुबडांना पकडून बँड लावले गेलेत. यातील दोन पिंगळ्यांना अतिसंरक्षित क्षेत्रातून पकडून बँड लावण्यात आले. संशोधनाच्या नावावर घुबडांच्या अधिवासात, तेही अतिसंरक्षित क्षेत्रात वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ती घुबडे विचलित झाली आहेत.

Tagging owls in lockdown in Melghat | मेळघाटात लॉकडाऊनमध्ये घुबडांना 'टॅगिंग'

मेळघाटात लॉकडाऊनमध्ये घुबडांना 'टॅगिंग'

googlenewsNext
ठळक मुद्देमानवी हस्तक्षेपामुळे विचलित : रेडिओ टँगिंगला दिली तिलांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : संशोधनाच्या नावावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चौराकुंड आणि हरिसाल वनपरिक्षेत्रात कोविड-१९ च्या लॉकडाऊनमध्येही घुबडांच्या पायाला कलर प्लास्टिक बँड लावून टॅगिंग करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमध्ये जंगलात कुणालाही जाण्यास मनाई होती. वन व वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून तसे आदेश निर्गमित आहेत. जंगलबंदी असतानाही एप्रिल महिन्यात ठिपकेवाला पिंगळा या प्रजातीतील सहा घुबडांना पकडून बँड लावले गेलेत. यातील दोन पिंगळ्यांना अतिसंरक्षित क्षेत्रातून पकडून बँड लावण्यात आले. संशोधनाच्या नावावर घुबडांच्या अधिवासात, तेही अतिसंरक्षित क्षेत्रात वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ती घुबडे विचलित झाली आहेत. ज्यांना उडता येत नाही, अशा पिलांनाही यात पकडण्यात आले आहे. पुणे येथील वन्यजीव संशोधन व संवर्धन संस्थेला हा संशोधन प्रकल्प मान्य केला गेला. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि चीफ वाईल्ड लाईफ वार्डन यांनी १० जुलै २०१९ ला त्यांना रेडिओ टेलिमेंट्री अंतर्गत रेडिओ टँगिंगकरिता त्या संस्थेला परवानगी दिली.
‘शेड्यूल फोर’ आणि ‘नॉन शेड्यूल’मधील घुबडांकरिता ही परवानगी होती. या परवानगीत रेडिओ टँगिंगकरिता ४२ घुबडांची परवानगी दिली. यात ‘शेड्यूल फोर’मधील घुबडांच्या सहा प्रजातीतील प्रत्येकी सहा असे एकूण ३६ आणि नॉन शेड्यूल सहा पक्ष्यांचा त्यात समावेश दिला. ही परवानगी केवळ बफर क्षेत्रात दिली गेली. राष्ट्रीय उद्यानासह वन्यजीव अभयारण्यात संरक्षित क्षेत्रात ही परवानगी नसल्याचे त्या पत्रात स्पष्ट केले गेले. रेडिओ टेलिमेंट्री, रेडिओ टॅगिंगला परवानगी असताना संस्थेने रेडिओ टॅगिंग केले नाही. परवानगीच्या विरुद्ध जाऊन कोर क्षेत्रातील घुबडांना पकडून साधे बँडिंंग केले. यात अतिसंरक्षित क्षेत्रातील झाडावरील घरट्यापर्यंत ते पोहोचले. त्या घरट्यात त्यांनी वारंवार डोकावून बघितले. घरट्यात हात घालून पिले, अंड्यांना हाताळले. कॅमेरा ट्रॅपची परवानगी नसताना ट्रॅप कॅमेरे लावलेत. त्यांच्या घरट्यात इंडोस्कोपिक कॅमेरेही सोडलेत. घुबडांना त्यांच्या पिलांना पकडण्याकरिता मासेमारीची ४५ एमएमची नेट (जाळी) ची तरतूदही त्यांनी केली. चौराकुंडच्या अतिसंरक्षित क्षेत्रात त्यांचा अधिक हस्तक्षेप राहला. तरी स्थानिक पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंतचा कुठलाही अधिकारी याविषयी स्पष्ट बोलायला तयार नाही.

चौराकुंडमध्ये रेडिओ टेलिमेंट्री, रेडिओ टॅगिंग केले गेले नाही. घुबडांच्या पायाला साधे प्लास्टिकचे कलर बँड लावण्यात आले आहेत. संबंधित संस्थेकडून ई-मेलद्वारे स्पष्टीकरण मागविण्यात आले. सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांनी फिल्डवर जाऊन चौकशी केली आहे.
- शिवबाला एस., उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प,
सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा.

Web Title: Tagging owls in lockdown in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.