शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यांकन न करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याच्या निलंबनाचा प्रस्ताव

By admin | Updated: May 3, 2015 00:32 IST

धडक सिंचन विहीर योजनेत मंजूर विहीरीचे विहीत मुदतीत हजेरी पट व मुल्याकंनाचा प्रस्ताव तहसिलदार .....

दप्तरदिरंगाई : धडक सिंचन विहीर योजनेच्या कामात कुचराईअमरावती : धडक सिंचन विहीर योजनेत मंजूर विहीरीचे विहीत मुदतीत हजेरी पट व मुल्याकंनाचा प्रस्ताव तहसिलदार कार्यालयाकडे सादर न केल्याने जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता प्रतिक मावळे यांच्या निलंबन कारवाईचा प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे सादर करण्यात आला आहे. भातकुली तालुक्यात धडक सिंचन विहीरीचे एकूण ४६ कामे ग्रामिण पाणीपुरवठा विभाग क्र २ यांच्या कडे देण्यात आले आहेत. शिवणी बु. येथे ३ सिंचन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. गावंडे नामक शेतकऱ्यांला सिंचन विहीर मंजूर झाल्याने त्यांच्या शेतात विहिरीच्या कामासाठी कनिष्ठ अभियंता यांनी विहिरीसाठी आखणी करून दिली होती त्यानुसार विहीरीचे खोदकाम सुरू केले होते.त्यानुसार तसे हजेरीपट तहसिल कार्यालयामार्फत १६ ते २२ एप्रिलपर्यंतचे कनिष्ठ अभियंता मावळे यांनी कामाचे मोजमाप घेऊन मूल्यांकनासह हजेतीपट कार्यालयात सादर करणे गरजेचे होते.जेणेकरूण कामाचा मोबदला मजुरांना तहसिल कार्यालयातून देण्यात आला असता. परंतु मूल्यांकन , हजेरीपट व मोजमाप पुस्तिका २४ एप्रिल पर्यत सादर केले नाही आणि याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने कारवाईचा प्रस्ताव उपअभियंता यांनी सादर केला आहे. सिंचन विहिरीच्या कामावरील मजुरांचे हजेरीपट व मुल्यांकन अहवाल विहीत मुदतीत देण्यास टाळाटाळ करणे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. अशा काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाई कारवाई केली जाईल. -किरण गीत्ते, जिल्हाधिकारी अमरावती.याबाबत कारवाईच्या संदर्भात प्राप्त झालेल्या प्रस्तावाची पडताळणी करूण नियमानुसार पुढील कारवाई करून अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल के.एम अहमद, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.कनिष्ठ अभियंत्यानी सिंचन विहीरीचे हजेरीपट व मूल्यांकनाचा प्रस्ताव २२ एप्रिलपर्यंत सादर केला नाही परिणामी मजुरांना मोबदला देता आला नाही उलट ते रजेवर गेल्याने कारवाईचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर केला आहे-आनंद दासवत, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग क्र. २.