शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

सार्सी गावाने मागितली आत्महत्येची परवानगी

By admin | Updated: October 29, 2015 00:27 IST

सोयाबीनची झडती किलोवर आली, कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. खरीप बुडाला, विहीर आहे पण वीज नाही, रबीचे पीक धोक्यात आहे.

खरीप बुडाला, तरीही पैसेवारी वाढली कशी ? : यशोमती ठाकूर यांनी फोडला प्रशासनाला घामअमरावती : सोयाबीनची झडती किलोवर आली, कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. खरीप बुडाला, विहीर आहे पण वीज नाही, रबीचे पीक धोक्यात आहे. पैसेवारी वाढली आहे. जगावे कसे, असा संतप्त सवाल करीत तिवसा तालुक्यातील सार्सी येथील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देऊन आत्महत्येची परवानगी मागितली. तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आक्रमक नेतृत्वामुळे काही समस्या त्वरीत निकाली काढण्यात आल्यात. सार्सी येथे अनेक दिवसांपासून वीज नाही. तासाभरापुरती आलीच तर विद्युत भार नसतो. त्यामुळे तीन दिवसांत १५ कृषीपंप जळालेत. रबीची पेरणी कशी करावी, अशी विचारणा आ. ठाकुर यांनी आयुक्तांना केली. यावर वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता बसेरीया, श्रीराव आदींना आयुक्तांनी तत्काळ बोलाविले. माहुली येथून नांदगाव पेठ येथील एमआयडीसीमध्ये काही उद्योगांना वीज दिली, सार्सी गावाला पुरवठा का नाही, अशी विचारणा आ. ठाकूर यांनी कार्यकारी अभियंत्यांना केली. यावर त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यावर आ. ठाकूर यांनी त्यांना खडेबोल सुनावले. खरिपाची नापिकी, वीज वितरणाच्या समस्या व स्थानिक समस्यांनी त्रस्त सार्सी येथील शेकडो नागरिकांनी आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर वाढीव पैसेवारी लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी आयुक्तांशी चर्चेदरम्यान केला.ग्रामपंचायतीचा कर्जमुक्तीचा ठराव !सोयाबीनचे उत्पन्न नाही, वीज बेपत्ता असते. ओलीताची सोय नाही, शासनाने सार्सीची पैसेवारी ५० पैशांच्या आत लावावी. गाव १०० टक्के कर्जमुक्त करावे, असा ठराव सार्सी ग्रापंने ९ आॅक्टोबरला पारीत केला. तो बुधवारी आयुक्तांना दिला. विजेची समस्या महिनाभरात निकालीसार्सी येथील विजेची समस्या महिनाभरात निकाली काढली जाईल. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पूर्ण भाराचा वीज पुरवठा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनीदेखील ‘कॅपेसीटर’ लावावेत, असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आयुक्तांना दिली ‘लाल्या’ची कपाशीसोयाबीन गेले, कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. पानगळ, बोंडगळ सुरू आहे. पाण्याअभावी कपाशीची मुळे सुकली आहेत. तरीही पैसेवारी का वाढते आहे, अशी विचारणा करीत शेतकऱ्यांनी ‘लाल्या’युक्त कपाशीचे पीक विभागीय आयुक्तांच्या स्वाधिन केले.विचोरी तलावातून मिळणार पाणीसार्सी येथे विचोरी पाझर तलाव आहे.येथून उपसा सिंचन करायला जिल्हा परिषदेची परवानगी नव्हती. आयुक्तांनी याविषयी अधिकाऱ्यांना त्वरीत निर्णय घेण्याचे आदेश दिले. यामुळे काही शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. खरे बोला, आमदारांनी सुनावलेसार्सी येथे कित्येक दिवसांत वीज नाही. मात्र, माहुलीतून कारखान्यांना वीज विकली. यावर कार्यकारी अभियंता बसेरीया यांनी गुळगुळीत उत्तर दिले. यावर यशोमतींनी आक्रमक होऊन ‘खरे बोला’ असे अभियंत्याला खडसावले. अधिकाऱ्यांना त्यावेळी घाम फुटला.