शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष

By admin | Updated: March 31, 2017 00:11 IST

याच भूमीतून इंदिराजींना व काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळाली होती. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात संघर्ष सुरू आहे.

यशोमती ठाकूर : चांदा ते बांदा संघर्षयात्रेची तिवस्यात झंझावती सभातिवसा : याच भूमीतून इंदिराजींना व काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळाली होती. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात संघर्ष सुरू आहे. कर्जमाफी ही फक्त उत्तर प्रदेशातच झाली पाहिजे, महाराष्ट्रात का नको, शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, त्यांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करू, असे अभिवचन आ. यशोमती ठाकूर यांनी दिले.या मागणीसाठी विरोधी पक्षांतर्फे चांदा ते बांदा यादरम्यान सुरू असलेली संघर्ष यात्रा गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात दाखल झाली व तिवसा येथील पेट्रोलपंप चौकात जाहीर सभा पार पडली. यावेळी आ. ठाकूर यांनी यात्रेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, पतंगराव कदम, रणजित कांबळे, वसुधा देशमुख, खा. नीतेश राणे, आ. वीरेंद्र जगताप, अमित झनक, अबू आझमी, सुनील केदार, अमर काळे, जितेंद्र आव्हाड, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, केवलराम काळे, माया चवरे आदी उपस्थित होते. कर्जमाफीपर्यंत अविरत संघर्षअमरावती : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधिमंडळ सभागृहात सातत्याने शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली. याआधीच्या अधिवेशनांमध्येही कर्जमाफीच्या मागणीवर विरोधक ठाम राहिले, मात्र तरीही सरकार ढिम्म असल्याने शेतकऱ्यांचा संघर्ष हा आता महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात लढला जाणार आहे. ४ एप्रिलपर्यंत या मागणीसाठी गावागावांत रान पेटविले जाणार आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष कदापिही सहन केले जाणार नाही, हाच संदेश उपस्थित मान्यवरांनी यावेळी दिला.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पार्टी, युनायटेड जनता दल, रिपाइं (कवाडे गट), एआयएमआयएम आदी पक्षांची संघर्ष यात्रेचे तिवसा येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी, शेतमजूर व सर्व विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ. यशोमती ठाकूर या सामान्य कार्यकर्त्यांसमवेत कार्यक्रम स्थळी मंचासमोरील भागात बसल्या होत्या. यावेळी सिद्धार्थ वानखडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाचे मिमिक्रीद्वारे वाभाडे काढले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन शहजाद पटेल यांनी केले. (प्रतिनिधी)