शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात आता स्पेशल 'टायगर प्रोटेक्शन फोर्स'

By admin | Updated: February 23, 2015 00:54 IST

केंद्र शासनाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकरिता स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स (एसटीपीएफ) मंजूर केला आहे. वाघांचे संरक्षण, संगोपन व शिकाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी ...

अमरावती : केंद्र शासनाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकरिता स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स (एसटीपीएफ) मंजूर केला आहे. वाघांचे संरक्षण, संगोपन व शिकाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी १११ जवानांची तुकडी या फोर्समध्ये राहणार आहे. सहायक वनसंरक्षकावर जबाबदारी सोपविली जाणार आहे. राज्य शासनाने अधिकृत शासन निर्णय काढताच भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.ताडोब्याच्या धर्तीवर हे फोर्स मंजूर करण्यात आले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांनी केंद्रीय पर्यावरण खात्याकडे सातत्त्याने पाठपुरावा करुन हे फोर्स मंजूर करुन घेतले. राज्यात असलेल्या सहा व्याघ्र प्रकल्पापैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मोठा विस्तार आहे. या प्रकल्पाला शिकाऱ्यांनी लक्ष्य केल्यामुळे वाघांचे संगोपन, संरक्षण करणे वनविभागाला कठीण झाले होते. मागील वर्षी ढाकणा, घटांग, जारीदा या वनपरिक्षेत्रात वाघांची हत्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. स्थानिकांना हाताशी धरुन आंतरराष्ट्रीय वाघ तस्कर वाघांची शिकार करीत असल्याची बाब स्पष्ट झाली होती. मात्र, व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या तोकड्या शस्त्रांच्या बळावर या शिकाऱ्यांचा मुकाबला करणे शक्य नाही. त्यामुळे अत्याधुनिक शस्त्रे, शिकाऱ्यांना जेरबंद करणारी साधन सामग्री, दुर्बीण, क्षणात माहिती मिळणारी यंत्रणा या फोर्सकडे राहणार आहे. केंद्र शासनाने या फोर्सला मंजुरी दिली असून प्रारंभी पाच वर्षे जवानांचे वेतन केंद्र शासन करेल. त्यानंतर आस्थापना खर्च हा राज्य शासनाला करावा लागणार आहे. त्याकरिता राज्य शासनाला अर्थसंकल्पात तरतूद करुन नव्याने शासन निर्णय काढावा लागणार आहे. सिपना, गुगामल व अकोट वन्यजीव विभागात हे फोर्स कार्यरत राहिल. तीन विभागात या तुकडीचे विभाजन केले जाणार आहे. एका तुकडीत २७ जवानांचा समावेश राहणार आहे. एसटीपीएफच्या मंजुरी फाईल राज्य शासनाच्या अर्थ खात्याकडे असल्याची माहिती आहे. एकदा अर्थ खात्याने मंजुरी दिली की, अर्थसंकल्पात तरतूद करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या फोर्सच्या गठनाबाबत स्वतंत्र शासन निर्णय काढला जाईल, असे क्षेत्र संचालक दिनेश त्यागी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)