शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंजवळ सहा लाख रोख; १० लाखांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:58 IST

Amravati : ५५ लाखांच्या मालमत्तेची नोंद

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दिव्यांगांसह सर्वसामान्यांसाठी शासनावर सातत्याने प्रहार करणारे अचलपूरचे आमदार बच्चू कड्डू पाचव्यांचा रिंगणात आहे. त्यांनी सोमवारी प्रहार पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याजवळ सहा लाखांची कॅश असल्याचे नमूद केले आहे.

कडू यांची जंगम मालमत्ता ५०.३८, लाख, तर स्थावर मालमत्ता ५५.५५ लाख आहे. त्यांच्यावर १०.८७ लाखांचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे ५९.६९ लाखांची जंगम, तर २.४५ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे शपथपत्रात नमूद आहे. सन २०१९ मध्ये बच्चू कडू यांच्याजवळ ३०.८१ लाखांची जंगम व १.१८ कोटींची स्थावर मालमत्ता व ९०.८१ लाखांचे कर्ज असल्याचे शपथपत्रात नमूद होते. कडू यांच्या मुंबईस्थित एसबीआय खात्यात २.३१ लाख, बेलोऱ्याच्या एडीसीसी खात्यात ९.५० लाख जमा आहेत. प्रहार फूड लिमिटेडमध्ये चार लाखांचे शेअर्स, दोन एलआयसी पॉलिसीज, ४५ ग्रॅम सोने व अर्धा किलो चांदी आहे. त्यांच्या मालकीचे १८ लाखांची चारचाकी आहे त्यांच्या पत्नी नयना कडू यांच्या विविध बँक खात्यात १४.०७ लाख जमा आहे. 

दोन दशकात विविध जिल्ह्यांत ४९ गुन्हे दाखल

  • दोन दशकात राज्यातील अनेक • जिल्ह्यांत आलेल्या विविध आंदोलनात बच्चू कडू यांच्याविरुद्ध तब्बल ४९ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये काही प्रकरणात निर्दोष, काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. 
  • बच्चू कडू यांची मौजा शिवंगा २ व मौजा शर्यतपूर शिवारात १० एकर जमीन आहे. याच शिवारात कडू यांच्या पत्नीच्या नावे २१ एकर शेती व काही प्लॉट आहे. शिवाय कडू यांच्याही नावे दोन प्लॉट आहेत.
  • आयकर विवरणानुसार बच्चू कडू यांचे सन २०१९-२० मध्ये वार्षिक उत्पन्न २६,५५ लाख होते, तर सन २०२३-२४ मध्ये ६४.३० लाखांचे झालेले आहे. त्यांच्या पत्नीच्याही उत्पन्नात दुपटीने वाढ झालेली आहे. 
टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावतीachalpur-acअचलपूर