शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयात मुद्रांकांचा तुटवडा

By admin | Updated: October 5, 2015 00:28 IST

दोन तीन दिवस सुटीचे आल्यामुळे अनेक मुद्रांक विक्रत्यांना बँकेत वेळेत चालान भरणे कठीण झाले.

ग्राहकांची फरफट : नागरिकांना करावी लागतेय तारेवरची कसरतअमरावती : दोन तीन दिवस सुटीचे आल्यामुळे अनेक मुद्रांक विक्रत्यांना बँकेत वेळेत चालान भरणे कठीण झाले. त्यामुळे ट्रेझरीतून मुद्रांक न मिळाल्याने मुद्रांक विक्रत्यांकडे गर्दी वाढली आहे. अनेकांकडे मुद्रांकाचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना रांगेत उभे राहून मुद्रांक विक्रेत्याकडे १०० रुपये, ५०० रुपयांचे मुद्रांक घ्यावे लागल्याचे चित्र आहे.त्याची नोंदणीदेखील नगारिकांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तहसील परिसरात जत्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याने मुद्रांक विक्रेता व काही ग्राहक महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाल्याचे कळते. आज पुन्हा रविवार आल्याने सोमवारी मुद्रांक विक्रेत्यांना बँकेत चालान काढावी लागणार आहे. नंतरच त्यांना ट्रेझरीतून मुद्रांक प्राप्त होणार आहे. त्यामुळे किमान मंगळवारपर्यंत तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिक व शैक्षणिक कामानिमित्त लागणाऱ्या मुद्रांक ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. महत्त्वाची कामे करताना ५० ऐवजी १०० रुपयांचे मुद्रांक विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक व पिळवणूक व वेळेचा अपव्यय होत आहे. (प्रतिनिधी)एका विक्रेत्याकडेच मुद्रांकाची व्यवस्थाअमरावती तहसील कार्यालयात नोंदणीकृत सात ते आठ मुद्रांक विक्रेते आहेत. परंतु बँकेत चालान न भरल्यामुळे ट्रेजरी आॅफीसरने त्यांना मुद्रांक दिले नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला फक्त एका मुद्रांक विक्रत्याकडेच मुद्रांक शिल्लक असल्याने नागरिकांनी शनिवारी गर्दी केली होती.