शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! फरार नीरव मोदी याची संपत्ती अमरावतीत

By गणेश वासनिक | Updated: April 30, 2024 11:53 IST

Amravati : पीएनबी बँकेकडून जप्तीची नोटीस; २५०० चौ. मी. जमीन घेणार ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
१४ हजार कोटींचा बँक घोटाळा करून भारतातून पसार झालेल्या नीरव मोदी याची संपत्ती अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने २५०० चौरस मीटर जमीन ताब्यात घेण्यासाठी २ एप्रिल २०२४ रोजी नोटीस जारी केली आहे. त्यामुळे नीरव मोदीचे अमरावती कनेक्शन शोधून काढणे सरकारपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.

पीएनबी बैंक घोटाळा हा देशातील सर्वांत मोठा घोटाळा ठरला आहे. पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. तो घोटाळा करून पाच वर्षांपासून फरार झाला होता. नीरव मोदीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान, पीएनबी बँकेला मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या परवानगीला ईडी हायकोर्टाने आव्हान दिले होते. मात्र, जनतेचा पैसा असल्यामुळे नीरव मोदीविरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाला ४२४ कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्याची विशेष परवानगी न्यायालयाने बँकेला दिली होती. तसेच ४८ मालमत्तांपैकी ४७ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

त्या अनुषंगाने २०१९ पासून पंजाब नॅशनल बँकेने १४ हजार कोटींच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीच्या संपत्तीचे सर्चिग सुरू केले आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात जमीन जप्तीसाठी पीएनबीने नोटीस जारी केली आहे.

मोदीवर ८ लाख ६२ हजार ९५१ रुपयांची थकबाकी
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथील सर्व्हे क्रमांक ३१३ मध्ये २५०० चौरस मीटर जमीन फरार आरोपी नीरव मोदी याच्या नावे असल्याची नोंद आहे. या जमिनीवर पंजाब नॅशनल बँकेकडून ३० जून २०१८ रोजी कर्ज घेतल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. १४.३० टक्के दराने व्याजासह ८ लाख ६२ हजार ९५१ रुपयांची थकबाकी दर्शविण्यात आली आहे. मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे वसुली अधिकारी आशु कुमार यांच्या स्वाक्षरीने नीरव डी. मोदी, ग्रोसवेनोर हाऊस, दुसरा माळा, पेडर रोड, मुंबई याच्या नावे असलेली २५०० चौ. मी. जमीन जप्त करण्याची नोटीस जारी केली आहे.
 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीAmravatiअमरावती