धक्कादायक! जिल्ह्यात ३८३ बालकांचा मृत्यू, २६ माताही दगावल्या; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 22:17 IST2026-04-30T22:17:18+5:302026-04-30T22:17:42+5:30

शासकीय रुग्णालयांतील आकडेवारी...

Shocking! 383 children die in the district, 26 mothers also die; Question mark on the health system | धक्कादायक! जिल्ह्यात ३८३ बालकांचा मृत्यू, २६ माताही दगावल्या; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

धक्कादायक! जिल्ह्यात ३८३ बालकांचा मृत्यू, २६ माताही दगावल्या; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अमरावती : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधून समोर आलेली बालमृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण ३८३ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर २६ माताही दगावल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या गर्भवती माता, नवजात व बालरुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, उपचारादरम्यान होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. बालमृत्यूंसोबतच मातामृत्यूंचे प्रमाणही लक्षवेधी आहे. प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंती, उशिरा रुग्णालयात दाखल होणे तसेच आवश्यक तज्ज्ञांची कमतरता ही मातामृत्यूची प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची मर्यादा आणि वेळेवर उपचार न मिळणे हीदेखील गंभीर बाब ठरत आहे. नवजात बालकांमध्ये कमी वजन, अकाली जन्म, संसर्गजन्य आजार आणि कुपोषण ही मृत्यूमागील प्रमुख कारणे आहेत. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक ५६ बालकांच्या मृत्यूची नोंद आहे. त्यामुळे माता व बालरुग्णांसाठी विशेष निगा, अत्याधुनिक उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

डफरीन रुग्णालयात सर्वाधिक २५१ बालकांचा मृत्यू -
जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्वाधिक २५१ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी रुग्णालयातील पाच वर्षातील सर्वाधिक बालमृत्यूची आहे. २०२१-२२ मध्ये १९८ बालमृत्यू, २०२२-२३ मध्ये २०५, २०२३-२४ मध्ये २२४ आणि २०२४-२५ मध्ये १८६ बालमृत्यूची नोंद आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून महिला प्रसूतीसाठी येत असल्याने मृत्यूची संख्या देखील अधिक आहे.

इर्विन रुग्णालयात सर्वाधिक माता मृत्यू -
जिल्ह्यात वर्षभरात शासकीय रुग्णालयात २६ मातांचे मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक ११ माता या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन)मध्ये दगावल्या आहेत. त्याचबरोबर डफरीनमध्ये ५ माता, धारणी उपजिल्हा रुग्णालयात २, अचलपूर जिल्हा स्त्री रुग्णालय २, तर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या आरोग्य केंद्रामध्ये ६ मातांच्या मृत्यूची नोंद आहे

सुपरमध्ये ४५ बालके दगावली -
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे नवजात शिशुसाठी एसएनसीयू विभाग आहे. येथे गंभीर बालकांना उपचारासाठी भरती केले जाते. येथे भरती असलेल्या नवजात शिशुंमधील तब्बल ४५ बालके ही उपचारादरम्यान दगावल्याची नोंद आहे.

Web Title : अमरावती: बाल मृत्यु दर चौंकाने वाला; स्वास्थ्य व्यवस्था पर सवाल

Web Summary : अमरावती जिले में 2025-26 में 383 बच्चों और 26 माताओं की मौत, स्वास्थ्य सेवाओं पर सवाल। डफ़रिन अस्पताल में सबसे ज़्यादा बच्चों की मौतें। इरविन अस्पताल में सबसे ज़्यादा माताओं की मौतें। कम वज़न और देरी से इलाज मुख्य कारण।

Web Title : Amravati: Shocking Child Mortality; Questions Raised on Healthcare System

Web Summary : Amravati district reports 383 child deaths and 26 maternal deaths in 2025-26, raising concerns about healthcare. Dufferin Hospital recorded the highest child deaths. Irvin Hospital saw the most maternal deaths. Low birth weight and delayed treatment are key factors.