भीषण आगीत सात दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:01:12+5:30

दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती येथील नागरिकांनी पोलिसांना व अग्निशमन विभागाला दिली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कार्यालय परिसरातच असल्याने पाण्याचे बंब तातडीने दाखल झाले. आग विझली तेव्हा सातही दुकानातील साहित्याचा कोळसा झाला होता. यामध्ये रशीद ऑटो डीलमधील दरवाजा, वायरिंंग व इतर साहित्य जळाले.

Seven shops were gutted in the blaze | भीषण आगीत सात दुकाने जळून खाक

भीषण आगीत सात दुकाने जळून खाक

ठळक मुद्देमालवीय चौक : पहाटे ४.३० वाजता अग्नितांडव; दुचाकी, टायर बेचिराख

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मालवीय चौकात असलेल्या टायर व ऑटो डीलच्या दुकानांना बुधवारी पहाटे ४.४५ वाजता भीषण आग लागली. यात सात दुकाने जळून खाक झाली. दुकानातील दुचाकी, टायर व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन विभागाच्या चार बंबांनी आगीवर चार तासांनी नियंत्रण मिळविले. सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.
दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती येथील नागरिकांनी पोलिसांना व अग्निशमन विभागाला दिली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कार्यालय परिसरातच असल्याने पाण्याचे बंब तातडीने दाखल झाले. आग विझली तेव्हा सातही दुकानातील साहित्याचा कोळसा झाला होता. यामध्ये रशीद ऑटो डीलमधील दरवाजा, वायरिंंग व इतर साहित्य जळाले. अप्सर ऑटो डील, अखिल ऑटो डीलमधील संपूर्ण साहित्य जळाले. लक्ष्मी टायर मधील जुने व रिमोल्ड टायर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. रॉयल ऑटो डीलचे साहित्य जळाले. मलखान ऑटो डीलमधील साहित्य व २० दुचाकी बेचिराख झाल्या. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शक्ती ऑटो डीलमधील टायर व दोन दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन विभाग व पोलिसांनी दिली. रात्रकालीन कर्तव्यावर असलेले अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले.

Web Title: Seven shops were gutted in the blaze

टॅग्स :fireआग