शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सातनूर शिवारात जुन्या वैमनस्यातून शेतमजुराची हत्या

By admin | Updated: March 14, 2015 00:29 IST

रवाळा शिवारात उमरी रस्त्यावर शेतात काम करीत असतांना अज्ञात आरोपीने काठीने व धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन एका शेतमजुराची हत्या केल्याची घटना ...

शेंदूरजनाघाट : रवाळा शिवारात उमरी रस्त्यावर शेतात काम करीत असतांना अज्ञात आरोपीने काठीने व धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन एका शेतमजुराची हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री शेंदुरजनाघाट पोलीस ठाण्यांतर्गत घडली. आदिवासी शेतमजुराच्या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयावरुन एकाला ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतकाचे नाव रामजी जोगी कुमरे (५५ रा. सातनूर) असे आहे. ते रवाळा शिवारातील शेतकरी सुधाकर भाजीखाये यांचेकडे कामावर होता. बैलजोडीवर रमेश फुसे यांचे शेतात १२ मार्चला काम करीत होता. सांयकाळच्या सुमारास शेतमालक फुसे यांना गंभीर जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेची शेंदूरजनाघाट पोलिसांना माहिती दिली. यावरुन पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत रामजी जोगी कुमरे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान आणला. सदर घटना ही जुन्या वैमन्यास्यावरुन घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पाहून अज्ञात मारेकऱ्यांनी संधी साधून काठी तसेच धारदार शस्त्राचे डोक्यावर प्रहार करुन जागीच ठार केले. मृतकाच्या चेहऱ्यावर, डोक्यावर मोठया प्रमाणात जखमा आढळून आल्यात. मृताचा मुलगा शिवा रामजी कुमरे (रा. सातनूर) यांच्या तक्रारीवरुन शेंदूरजनाघाट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अमरावतीवरुन श्वान पथकालासुध्दा पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वानपथकाला आरोपीचा सुगावा लागला नाही. घटनेचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी राजा रामासामी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अशोक लांडे, दुय्यम ठाणेदार अनिल सिरसाठसह शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहे.