शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओने जप्त केलेल्या ऑटोरिक्षांचे झाले सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

आरटीओने वर्षभरात १० पेक्षा जास्त ऑटोरिक्षा जप्त केले आहेत. त्या ऑटोरिक्षांनी कुणी वाली नसल्याने किंवा किंमतीपेक्षा आरटीओने विविध शीर्षाखाली आकारलेल्या दंडाची रक्कम अधिक असल्याने अशा वेळेस ऑटोरिक्षांचे मूळ मालक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून हा दंड भरुन नियमानुसार ऑटोरिक्षा सोडवून नेत नाहीत.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : इंजीनसह इतर साहित्य गायब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाहनमालकाच्या नावावर ऑटोरिक्षाचा चालक परवाना नसणे, आरटीओच्या नियमानुसार ऑटोरिक्षांचा कर न भरणे, अनेक वर्षे कर बुडीत ठेवणे किंवा नियमाने ऑटोरिक्षांचे फिटनेस नसणे आदी कारणांनी आरटीओचे मोटर वाहन निरीक्षक कारवाईदरम्यान ऑटोरिक्षा जप्त करतात. त्यानंतर त्या ऑटोरिक्षा आरटीओ कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात येतात. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ऑटोरिक्षांचे इंजीनसह इतर साहित्य गायब असून, फक्त ऑटोरिक्षांचे सापळे तेवढे राहिले असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.आरटीओने वर्षभरात १० पेक्षा जास्त ऑटोरिक्षा जप्त केले आहेत. त्या ऑटोरिक्षांनी कुणी वाली नसल्याने किंवा किंमतीपेक्षा आरटीओने विविध शीर्षाखाली आकारलेल्या दंडाची रक्कम अधिक असल्याने अशा वेळेस ऑटोरिक्षांचे मूळ मालक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून हा दंड भरुन नियमानुसार ऑटोरिक्षा सोडवून नेत नाहीत. त्यामुळे अनेक वर्षे सदर ऑटोरिक्षा पडून राहिल्यास आरटीओ परिवहन विभागाकडून त्यांच्यासह इतर वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी घेते व सदर ऑटोरिक्षांचा जाहीर लिलाव करण्यात येतो. अशा प्रकारचा लिलाव यापूर्वी फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आला होता. त्यामध्ये २५ ऑटोरिक्षांचा लिलाव करण्यात आला होता, अशी माहिती आहे. मात्र, त्यानंतर जप्त झालेल्या ऑटोरिक्षांचे सुटे भाग परिसरातून चोरीला गेल्याची जोरदार चर्चा आहे. सदर सुटे भाग हे चालकच घेवून गेले की चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी, ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही. एकदा परिसरात ऑटोरिक्षा लावला की, त्याकडे अधिकाऱ्यांचेसुद्धा दुर्लक्ष होते. त्यामुळे ऑटोरिक्षा दंड भरुन ज्यांना सोडून न्यायचा नाही, ते आरटीओकडे जप्त असलेल्या ऑटोरिक्षाचे विविध महत्त्वाचे सुटे भाग काढून नेत असल्याची चर्चा आहे. याला नेमकी कुणाची संमती असते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आरटीओने रीतसर जप्त केलेल्या वाहनांचे इंजीन व इतर साहित्य चोरीला जातेच कसे, असा प्रश्नसुद्धा पुढे येत आहे.गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात २५ ऑटोेरिक्षांचा लिलाव करण्यात आला आहे. रात्री गस्तीवर एकच वॉचमॅन आहे. त्यामुळे आॅटोरिक्षांच्या सुट्या भागांची चोरी झाली असावी. याची माहिती मागविण्यात येईल.- रामभाऊ गितेप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस