शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती पकडण्यासाठी महसूल विभागाची पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

आ. देवेंद्र भुयार यांनी दोन्ही राज्यांच्या प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून जलसंधारण आणि थांबलेले काम सुरू करण्याकरिता मध्य प्रदेशातून रेती वाहतूक आणि स्टोन क्रशरवरून गिट्टी मिळावी, याकरिता प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारने १९ टिप्परला सौंसर (मध्यप्रदेश) घाटातून रेती वाहतुकीला परवानगी दिली. परंतु, काही दिवस परवानगीप्राप्त वाहने चालल्यानंतर रेती तस्करांनी शेकडो टिप्पर रेतीची वाहतूक विनापरवानगी चालविली आहे.

ठळक मुद्देआमदारही आक्रमक : तहसीलदार म्हणाले, वाहतुकीवर कारवाई करू

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासनाच्या परवानगीआड तालुक्यात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. लॉकडाऊनचा गैरफायदा उठवत हा गोरखधंदा दिवसाढवळ्या सुरू आहे. महसूल व पोलीस यंत्रणा लॉकडाऊन व संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात गर्क असल्यामुळे त्यात भर पडली आहे. अवैध रेतीची ही वाहतूक थांबविण्यासाठी तहसील स्तरावर पथके गठित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुनील सावंत यांनी दिली. याप्रकरणी आमदारही आक्रमक झाले. तहसील यंत्रणा कारवाई करीत नसेल, तर आपण रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला.लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे वरूड मोर्शी तालुक्यात शासकीय बांधकामे रखडली आहेत. त्याअनुषंगाने आ. देवेंद्र भुयार यांनी दोन्ही राज्यांच्या प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून जलसंधारण आणि थांबलेले काम सुरू करण्याकरिता मध्य प्रदेशातून रेती वाहतूक आणि स्टोन क्रशरवरून गिट्टी मिळावी, याकरिता प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारने १९ टिप्परला सौंसर (मध्यप्रदेश) घाटातून रेती वाहतुकीला परवानगी दिली. परंतु, काही दिवस परवानगीप्राप्त वाहने चालल्यानंतर रेती तस्करांनी शेकडो टिप्पर रेतीची वाहतूक विनापरवानगी चालविली आहे. अमरावती, अकोलापर्यंत ही रेती नेली जात आहे. २८ एप्रिल रोजी अमरावती आणि छिंदवाडा जिल्हाधिकाऱ्यांनी सहा कंत्राटदारांच्या १९ टिप्पर ट्रकला परवानगी दिली. या परवानगीवरून दोन-तीन दिवस अधिकृत परवानाप्राप्त वाहनांनी रेतीची वाहतूक झाली. मात्र त्यानंतर लॉकडाऊनचा गैरफायदा घेत शेकडो टिप्पर रस्त्यावर उतरले.जलसंधारण आणि शासकीय कामांकरिता रेती वाहतुकीची परवानगी दिलेली वाहने वगळता अनधिकृत रेती वाहतूक करणाºया वाहनाचा शोध घेऊन कारवाई करू. याकरिता पथके नेमली आहेत.- सुनील सावंत, तहसीलदाररेती तस्करी सुरूच आहे. प्रशासन हातावर हात धरून बसल्यास स्वत: कारकर्त्यांसह टिप्पर पकडून पोलिसांच्या ताब्यात देईन व याबाबत राज्य शासनाकडे तक्रार करेन.- देवेंद्र भुयारआमदार, मोर्शी

टॅग्स :sandवाळू