शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वे तालुक्यातील कोरोनायोद्ध्यांचा महसूल विभागातर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण, जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सोहळा चांदूर रेल्वे : शहरातील प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण उपविभागीय ...

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण, जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात

सोहळा

चांदूर रेल्वे : शहरातील प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी कोरोनायोद्ध्यांचा सत्कार महसूल विभागाच्यावतीने करण्यात आला.

उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांच्या आगमनानंतर सर्वप्रथम संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पोलीस पथक व अशोक महाविद्यालयाच्या एनसीसी पथकाने पथसंचलन केले. यावेळी तहसीलदार राजेंद्र इंगळे, ठाणेदार मगन मेहते, नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, माजी सुभेदार जगन्नाथ गवई, पंचायत समिती सदस्य अमोल होले, श्रद्धा वऱ्हाडे यांसह अनेकांची उपस्थिती होती.

लॉकडाऊनच्या काळात भिकारी व वेडसर लोकांना जेवणाचे डबे पुरविणारे साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले, गरजूंना जेवण पुरविणारे पुरुषोत्तम भुते, जय हिंद क्रीडा मंडळाचे सदस्य मिथीलेश विश्वकर्मा, गरजूंना अन्नधान्य किट वाटप करणारे जगदीश काशीकर, दारासिंह राठोड, परीक्षित जगताप, विनय कडू, माजी सुभेदार जगन्नाथ गवई, मोहम्मद मतीन इकबाल लाखानी, दुचाकीने फिरून चहा व पाणी वाटप करणारे विवेक ऊर्फ राजू चर्जन, शासकीय कार्यालयात सॅनिटायझर स्प्रे-पंप देणारे साजिद जानवानी, परराज्यातील प्रवाशांकडून योग्य तेच भाडे घेऊन त्यांना सोडणारे अविनाश कैलकार, अडकलेल्या मजुरांना कपडे वाटप करणारे सुनील भूत, प्रकाश मोटवानी, चांगल्या प्रकारे जनजागृती करून लोकांना लोकशिक्षण देणारे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व स्वाभिमानी पत्रकार संघ, विविध शासकीय कार्यालयातील या कालावधीत केलेल्या सेवेबाबत नगर परिषदेचे सफाई कर्मचारी विजय कनोजे, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे, मंडळ अधिकारी सतीश गोसावी, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथील कर्मचारी शेखर देशमुख यांचा कोरोनायोद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.