५५ रू पयांत पडली परतवाडा-वलगाव फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:07+5:30

शुक्रवारी सकाळी ७ वाजतापासून आठ बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्यात. यात परतवाडा येथून नागपूर, अकोला, अमरावतीकरिता एसटी बसेस सोडण्यसात आल्या नव्हत्या. केवळ वलगाव, अंजनगाव, चिखलदरा, असदपूर, धारणी, भोकरबर्डीपर्यंत या बसेस सोडण्यात आल्यात. सकाळी परतवाड्यातून वलगावपर्यंत पाठविण्यात आलेल्या बसमध्ये केवळ एका प्रवाशाने प्रवास केला.

Return to Paratwada-Valgaon tour at Rs fiftyfive | ५५ रू पयांत पडली परतवाडा-वलगाव फेरी

५५ रू पयांत पडली परतवाडा-वलगाव फेरी

Next
ठळक मुद्देरिकाम्या धावल्यात एसटी बसेस

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : स्थानिक डेपोतून सुटलेल्या एसटीबसला शुक्रवारी प्रवासीच मिळाले नाही. प्रवाशाविनाच त्या बसेस रिकाम्या धावल्यात, तर प्रवाशांअभावी निम्याहून अधिक फेऱ्या वेळेवर रद्द कराव्या लागल्यात.
शुक्रवारी सकाळी ७ वाजतापासून आठ बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्यात. यात परतवाडा येथून नागपूर, अकोला, अमरावतीकरिता एसटी बसेस सोडण्यसात आल्या नव्हत्या. केवळ वलगाव, अंजनगाव, चिखलदरा, असदपूर, धारणी, भोकरबर्डीपर्यंत या बसेस सोडण्यात आल्यात. सकाळी परतवाड्यातून वलगावपर्यंत पाठविण्यात आलेल्या बसमध्ये केवळ एका प्रवाशाने प्रवास केला. वलगावहून ही बस रिकामी परतवाड्यात परत आली. रस्त्यात या बसला एकही प्रवासी मिळाला नाही. यात परतवाडा-वलगाव फेरी महामंडळाला ५५ रुपयांत पडली.
२४ मार्चपासून परतवाडा डेपोतून एसटीची वाहतूक बंद पडली होती. बऱ्याच अवधीनंतर शुक्रवार २२ मे रोजी ही वाहतूक सुरू झाली. पण प्रवाशांनी या वाहतूकीला प्रतिसादच दिलेला नाही. डेपोतून मार्गावर सोडण्यापूर्वी या एसटी बसेससह संपूर्ण डेपो परिसराचे निर्जंतुकीकरण केल्या गेले. एसटी बसेस स्वच्छ धुवून काढल्या गेल्यात. अचलपूर नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या गाडीनेही डेपो परिसर स्वच्छ धुवून काढला. सामाजिक अंतर पाळण्याकरिता एसटी बसमधून २१ प्रवाशांनाच नेण्याची अनुमती देण्यात आली होती. पण प्रवाशीच नसल्यामुळे अनेक एसटी फेºया रिकाम्या गेल्या.

Web Title: Return to Paratwada-Valgaon tour at Rs fiftyfive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.