शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एका लग्नाची अशीही गोष्ट : व्यसनमुक्तीचे वचन देताच पहिल्या पतीशी पुनर्विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 16:19 IST

पतीला मद्यपानाचे व्यसन जडल्याने महिलेने घटस्फोट घेतला. त्यानंतर दुसरा पतीदेखील मद्यपी निघाल्याने ती गेली २० वर्षे माहेरीच होती. इतक्या वर्षांनी पहिला पती परत आला आणि त्याने व्यसनमुक्तीचे वचन दिले व वीस वर्षानंतर त्यांचा पुनर्विवाह थाटात पार पडला.

ठळक मुद्देदाम्पत्य आले पुन्हा एकत्र, २० वर्षांपासून मद्यपानाला कंटाळून महिलेने सोडले होते सासर

अमरावती : पतीला मद्यपानाचे व्यसन जडले आणि तो पत्नीला त्रास देऊ लागला. या जाचापायी कंटाळून महिलेने घटस्फोट घेतला. त्यानंतर दुसरा पतीदेखील मद्यपी निघाल्याने ती माहेरीच राहत होती. तब्बल २० वर्षांनंतर पहिला पती आला, त्याने व्यसनमुक्तीचे वचन दिले आणि पती-पत्नी पुन्हा एकदा एकत्र आले. वीस वर्षानंतर त्यांचा पुनर्विवाह थाटात पार पडला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा गावात शनिवारी सायंकाळी पार पडलेला हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुऱ्हा येथील श्यामराव मोरे यांची मुलगी सुगंधा यांचा विवाह २० वर्षांपूर्वी लाखपुरी (ता. मूर्तिजापूर) येथील संतोष जामनिक (४७) यांच्याशी झाला होता. सात वर्षे संसार सुरळीत चालला. यानंतर संतोषला दारूचे व्यसन जडल्याने दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळे सुगंधा पतीला सोडून माहेरी आली. तेथून दोन वर्षांनंतर सुगंधाचे दुसरीकडे लग्न झाले. पण, दुसरा पतीदेखील दारूडा होता. तो दारूच्या नशेत मारहाण करत असल्याने सुगंधा परत माहेरी निघून आली. त्यानंतर आई-वडिलांच्या घरी राहून शेतीची कामे ती करू लागली. सुगंधाला अपत्य नाही, तर दुसरीकडे सुगंधाचा पहिला पती संतोष जामनिक हा २० वर्षांपासून पत्नीविना होता.

वीस वर्षांनंतर संतोष हा सुगंधाच्या आई-वडिलांच्या भेटीसाठी आला. त्याने सुगंधासोबत पुनर्विवाह करण्याची इच्छा तिच्या आई-वडिलांकडे बोलून दाखविली. आता मद्यपान करणार नाही, असे त्यांना वचन दिले. त्यामुळे सुगंधासह तिच्या आईवडिलांनी या पुनर्विवाहाला होकार दिला. पुनर्विवाह शनिवारी सायंकाळी मुऱ्हा येथील बुद्धविहारात पार पडला. बौद्ध परंपरेनुसार भिक्खूंच्या हस्ते हा पुनर्विवाह पार पडला. यावेळी आशीर्वाद देण्यासाठी गावातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक