शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटी भगिनी बनतील ‘लखपतीदीदी’, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 05:51 IST

वर्धा आणि अमरावती मतदारसंघासाठी लोकसभा निवडणूक प्रचाराची विदर्भातील तिसरी सभा शुक्रवारी सायंकाळी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्क, वर्धा/ अमरावती : ‘चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आणि सभेला उपस्थित सर्व बंधू, भगिनींना माझा जय गुरुदेव’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीच्या महासंगमाची ही भूमी असून बलिदानाची गाथा सांगणाऱ्या आष्टी (शहीद) गावाची प्रेरणा आहे. गेल्या दहा वर्षांत आपण स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून महिलांसाठी एक चळवळ उभारली असून त्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी विविध क्षेत्रातील तीन कोटी भगिनींना लखपतीदीदी बनविणार ही मोदीची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.

वर्धा आणि अमरावती मतदारसंघासाठी लोकसभा निवडणूक प्रचाराची विदर्भातील तिसरी सभा शुक्रवारी सायंकाळी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे पार पडली. काँग्रेसने आजवर सामान्य माणसाची थट्टाच केली आहे. मात्र. गेल्या दहा वर्षांत चित्र बदलले आहे. देश आत्मनिर्भर होऊ लागला आहे.

गॅरंटी हा आपल्यासाठी तीन अक्षरांचा खेळ नसून देशाचा विकास करण्याचा संकल्प आहे. पुढील पाच वर्षांत गरिबांसाठी तीन कोटी नवीन घरे बांधली जाणार आहेत. प्रत्येक घरात पाण्याचा नळ पोहोचलेला असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या प्रत्येक वृद्धाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार दिला जाईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आता घरोघरी पाइपने पोहोचणार गॅसआधी प्रत्येकाला गॅस सिलिंडर देण्याचे काम एनडीए सरकारने केले आहे. भविष्यात प्रत्येक घरात पाइपलाइनद्वारे गॅस पोहोचणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. काँग्रेसने विदर्भाची नेहमी उपेक्षाच केली आहे. त्यामुळे त्यांना जनतेने नाकारले. मात्र गेल्या दहा वर्षांत विदर्भाचाही झपाट्याने विकास होत असल्याचे आपण बघताहात. इंडी आघाडीच्या नेत्यांकडे विकासावर बोलण्यासाठी काही नाही.त्यामुळेच आता ते शिवराळ भाषेचा वापर करू लागले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

अमरावतीत टेक्सटाइल पार्क- देशात उभारल्या जाणाऱ्या टेक्सटाइल पार्कमध्ये अमरावतीचाही समावेश करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.- या पार्कमुळे लाखो लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.- अमरावतीची संत्रा आणि वर्धा जिल्ह्याची हळदीमुळे सर्वदूर ओळख असल्याची बाबही त्यांनी भाषणात नमूद केली.

टॅग्स :Amravatiअमरावतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी