शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांनी हुडकून काढले गैरहजर अधिकारी

By admin | Updated: November 10, 2014 22:36 IST

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सतीश उईके यांनी सूत्रे स्वीकारताच सोमवार १० नोव्हेंबर रोजी आपल्या कामांचा धडाका सुरू करून सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास काही विभागांना आकस्मिक भेट

अमरावती : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सतीश उईके यांनी सूत्रे स्वीकारताच सोमवार १० नोव्हेंबर रोजी आपल्या कामांचा धडाका सुरू करून सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास काही विभागांना आकस्मिक भेट देऊन जिल्हा परिषदेतील हजर व गैरहजर अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष त्यांच्या दालनात पोहोचून शोधमोहीम राबविली. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध विभागांचे खातेप्रमुख आठवड्याचा पहिला दिवस असलेल्या सोमवार या दिवशीही मुख्यालयात हजर राहत नसल्याने बाहेर ठिकाणाहून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना रित्या हातानेच परतावे लागते. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके यांनी दुपारी ४ वाजता प्रथम जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी एन. एन. भालेराव यांचे दालन गाठून आकस्मिक भेट दिली असता या ठिकाणी या विभागाचा जबाबदार अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले. दरम्यान अध्यक्षांनी याठिकाणी उपस्थित असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांची पेशी घेऊन त्यांच्याकडून अधिकाऱ्याच्या दौऱ्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी दौऱ्याबाबतचे नियोजन पुस्तिका मागून त्यांनी शेरा नोंदविला. त्यानंतर अध्यक्षांनी भूजल सर्वेक्षण विभागाचे कार्यालय गाठले. या ठिकाणी खातेप्रमुख गैरहजर असल्याचे आढळून आले. केवळ चार कर्मचारी उपस्थित होते. गैरहजर राहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला खुलासा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अध्यक्षांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. भागवत यांचे दालन गाठले. मात्र याठिकाणी भागवत हजर असल्याचे त्यांना आढळून आले. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रक बोलावून हजर व गैरहजर कर्मचाऱ्यांची पडताळणी केली. पहिल्यांदाच जिल्हा परिषद अध्यक्षांनी विविध विभागांच्या खाते प्रमुखांनी सोमवार व शुक्रवार या दोन दिवस आपल्या मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश यापूर्वीच दिले होते.