शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
4
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
5
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
6
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
7
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
8
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
9
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
10
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
11
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
12
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
13
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
14
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
15
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
16
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
17
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
18
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
19
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
20
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
Daily Top 2Weekly Top 5

Achalpur: अकोटनंतर अचलपूरमध्येही भाजप- एमआयएम एकत्र, अनपेक्षित युतीमुळं चर्चांना उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:55 IST

Achalpur Nagar Parishad: अमरावती जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी! अचलपूर नगरपरिषदेत समितीच्या सभापती पदांसाठी कट्टर विरोधक भाजप आणि एमआयएम एकत्र आले आहेत.

राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो', या उक्तीचा प्रत्यय अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत पाहायला मिळाला. कट्टर हिंदुत्ववादी विचारधारा असलेला भाजप आणि एमआयएम या दोन परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांनी सत्तेसाठी चक्क एकमेकांशी हातमिळवणी केली. अकोटनंतर आता अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेतही हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

अचलपूर नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडीत भाजपने अत्यंत धक्कादायक रणनीती आखली. सत्तेचे गणित जुळवण्यासाठी भाजपने एमआयएमच्या तीन नगरसेवकांना सोबत घेतले. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवकांच्या एक गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. या युतीचा मोठा फायदा एमआयएमला झाला आहे. भाजपच्या पाठिंब्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापतीपद मिळाले. या बदल्यात एमआयएमच्या सदस्यांनी इतर समित्यांच्या निवडीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करून साथ दिली. दोन्ही पक्षांच्या या देण्या-घेण्याच्या राजकारणामुळे नगरपरिषदेवर या नव्या युतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. भाजपने नेहमीच एमआयएमवर कट्टरतावादाचा आरोप केला होता, तर एमआयएमने भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला विरोध केला होता. मात्र, अचलपूरमध्ये सभापती पदाच्या खुर्चीसाठी हे जुने सर्व वाद विसरून दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे चित्र दिसत आहे.

राजकीय चर्चांना उधाण

भाजपची हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख आहे. अशा स्थितीत त्यांनी एमआयएमसोबत केलेल्या या युतीमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ही युती केवळ स्थानिक विकासासाठी आहे की, केवळ सत्तेत राहण्यासाठी, असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Achalpur: BJP and MIM Unite After Akot, Sparking Political Uproar

Web Summary : In Achalpur, BJP and MIM formed an unexpected alliance for power in the Nagar Parishad, echoing a similar move in Akot. This partnership has stirred controversy, raising questions about ideological compromises for political gain and local development.
टॅग्स :achalpur-acअचलपूरBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPoliticsराजकारण