शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत ‘जकात’चा सूर

By admin | Updated: August 14, 2014 23:27 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) हवे की, जकात हा निर्णय राज्य शासनाने महापालिकांवर सोपविला आहे. मात्र अमरावती महापालिकेतील पदाधिकारी व सदस्यांनी जकात कर ही प्रणाली लागू व्हावी,

नगरसेवक बाजूने : आमसभेच्या ठरावानंतर शासन देणार हिरवी झेंडीअमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) हवे की, जकात हा निर्णय राज्य शासनाने महापालिकांवर सोपविला आहे. मात्र अमरावती महापालिकेतील पदाधिकारी व सदस्यांनी जकात कर ही प्रणाली लागू व्हावी, असा सूर आवळला. येत्या काही दिवसांतच या विषयावर आमसभा घेवून ठराव मंजूर करुन तो शासनाला पाठविला जाणार आहे.मुंबई येथे मंत्रालयात बुधवारी पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यावसायिकांच्या मागणीचा विचार करीत एलबीटी की, जकात यापैकी कोणती कर प्रणाली लागू ठेवावी हा निर्णय महापालिकांनी घ्यावा , अशी मुभा दिली आहे. त्यामुळे अमरावती महापालिकेत कोणती कर प्रणाली लागू होणार या विषयी अनेक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांशी गुरुवारी संवाद साधला असता एलबीटी वसुलीचे बारा वाजल्याने ही प्रणाली येथे सुरळितपणे चालू शकणार नाही, असे अनेकांचे मत आहे. १ जुलै २०१२ पासून एलबीटी ही कर प्रणाली लागू करण्यात आली. पुढील आठवड्यात बैठकदोन वर्षांचा एलबीटी वसुलीचा गोषवारा बघितला तर अर्थसंकल्पात एलबीटी उत्पन्नाच्या तरतुदीनुसार रक्कम वसूल होत नसल्याचे स्पष्ट होते. यंदा महापालिका अर्थसंकल्पात एलबीटी उत्पन्नाचे १२५ कोटी उत्पन्न निश्चित करण्यात आले होते. परंतु एलबीटी ला व्यावसायिकांचा विरोध आणि या कराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या व्यक्तव्यानंतर व्यावसायिकांनी एलबीटी भरणे बंद केले. परिणामी एलबीटी वसुली कमालीची माघारली. महापालिकेचा आर्थिक डोलारा ढासळला. कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची रक्कम, कंत्राटदार व पुरवठादारांची थकबाकी, प्रशासकीय कारभार कसा चालवावा हा प्रश्न आयुक्त अरुण डोंगरे यांच्यापुढे निर्माण झाला. महापालिकेची निर्माण झालेली परिस्थिती आयुक्तांनी राज्य शासनालासुद्धा कळविली असल्याची माहिती आहे.महापालिकेचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी जकात कर हा पर्याय योग्य असल्याचे मत सदस्यांचे आहे. जकात कर प्रणाली ही अभिकर्ता तत्त्वावर सुरु राहत असल्याने एलबीटीमध्ये गुंतून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर कामांची जबाबदारी सोपविता येईल, असे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, रिपाइं, बसप, जनविकास काँग्रेसच्या सदस्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)