शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अर्धवट शेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर तब्बल चार महिन्यांपूर्वी बऱ्याच रेल्वेस्थानकावरून मेमू ट्रेन सुरू करण्यात आल्या. तेव्हाच बडनेरा रेल्वेस्थानकावरून बडनेरा ते भुसावळ आठ डब्यांची अनारक्षित मेमू सुरू झाली. ही ट्रेन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून सुटते. या प्लॅटफॉर्मच्या अर्ध्या भागातच शेड आहे.  या वर्षी उन्हाळा चांगलाच तापतो आहे. उष्माघातामुळे बऱ्याच लोकांचे जीव गेलेत. लोक आजारी पडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेरा रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर अर्धवट शेडमुळे रखरखत्या उन्हात उभे राहून प्रवाशांना मेमू ट्रेन पकडावी लागते. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीबाबत कितपत गंभीर आहे, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. लहान मुलांना याचा प्रचंड त्रास येथे झेलावा लागतो आहे.कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर तब्बल चार महिन्यांपूर्वी बऱ्याच रेल्वेस्थानकावरून मेमू ट्रेन सुरू करण्यात आल्या. तेव्हाच बडनेरा रेल्वेस्थानकावरून बडनेरा ते भुसावळ आठ डब्यांची अनारक्षित मेमू सुरू झाली. ही ट्रेन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून सुटते. या प्लॅटफॉर्मच्या अर्ध्या भागातच शेड आहे.  या वर्षी उन्हाळा चांगलाच तापतो आहे. उष्माघातामुळे बऱ्याच लोकांचे जीव गेलेत. लोक आजारी पडत आहेत. येथे मात्र सोईअभावी प्रवाशांना उन्हाचे प्रखर चटके सहन करीत मेमू ट्रेन पकडावी लागते आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ ला संपूर्ण शेड उभारण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाने तत्काळ कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गामध्ये जोर धरून आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांनी याची विशेष करून दखल घ्यावी, असेही बोलले जात आहे. पुढे पावसाळा आहे. त्यापूर्वी शेड न झाल्यास प्रवाशांना नक्कीच पावसाच्या सरींनी ओले होत प्रवास करावा लागेल.

एकाच मेमूवर प्रवाशांचा भारआठ डब्यांची बडनेरा ते भुसावळ मेमू ट्रेन प्रवाशांच्या गर्दीने सारखी भरून जाते. परत येताना तेवढीच प्रवासी संख्या असते. अनारक्षित तिकीट असल्याने गावखेड्यांवरील लोक, शाळकरी विद्यार्थी तसेच शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्यांची मोठी गर्दी या गाडीवर असते. कोरोनाआधी पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. त्यामध्ये प्रवासी अधिक क्षमतेने जात होते. आता मात्र केवळ आठ डब्यांच्या व एकच फेरी असणाऱ्या मेमू ट्रेनवर प्रवाशांचा अधिक भार पडतो आहे. रेल्वे प्रशासनाने बडनेरातून दोन मेमू  सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांसह शहरवासीयांमध्ये आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे