शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वादग्रस्त जागेवरील वृक्षारोपण काढण्याचे आदेश

By admin | Updated: August 14, 2015 01:01 IST

तालुक्यातील ब्राह्मणवाडा (थडी) ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील बौध्दविहार आणि हनुमान मंदिराच्या जागेचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे.

धार्मिक स्थळांचा वाद : ब्राह्मणवाडा थडी येथे तातडीची सभा चांदूरबाजार : तालुक्यातील ब्राह्मणवाडा (थडी) ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील बौध्दविहार आणि हनुमान मंदिराच्या जागेचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. पुन्हा याच वादग्रस्त जागेत केलेल्या वृक्षारोपणाने नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. त्यात भारतीय दलित पँथरने चिंचोली येथे बौध्द धर्मियांचा छळ होत असल्याची तक्रार बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या पार्श्वभूमिवर उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी चिंचोली येथे तातडीची बैठक घेऊन वादग्रस्त जागेवरील वृक्षारोपण त्वरित काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले आहेत. चिंचोली येथील हनुमान मंदिराच्या पूर्वेकडे मोकळी जागा आहे. तर दक्षिणेकडे बौध्द विहार आहे. ही मोकळी जागा हनुमान मंदिराच्या मालकीची असल्याचे मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे म्हणणे आहे तर येथून वहिवाटीचा सार्वजनिक रस्ता असल्याचे बौध्द उपासकांचे म्हणणे आहे. हा वाद गेल्या अनेक वर्र्षांंपासून महसूल विभागाकडे सुरू होता. त्यात १२ सप्टेंबर २०१४ रोजी चांदूरबाजारच्या तहसीलदारांनी एक आदेश काढून येथे अतिक्रमण आढळल्यास ते हटविण्याबाबतची कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायत सचिवांना दिले होते. याशिवाय या जागेचे मोजणी शुल्क घेऊन मोजणी अहवाल सादर करण्याचे आदेश उपअधीक्षक तालुका भूमीअभिलेख चांदूरबाजार यांना दिले. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याने या जागेचा वाद कायम आहे. त्यात या जागेवर वृक्षारोपण करण्यात आल्याने त्यात आणखी भर पडली आहे. स्थानिक ग्रामपंचायत तसेच तहसीलदार यांनी या बाबीकडे लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)