शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

निम्न प्रतिचा कांदा हा १५०० ते ३००० हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. हाच कांदा बाजार समितीतून व्यावसायिकांनी खरेदी केल्यानंतर त्याची दामदुप्पट म्हणजे ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

ठळक मुद्देबाजार समितीत ५५०० प्रतिक्विंटलचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: गेल्या आठवड्याभरापासून कांद्याने पाचहजारी गाठली असून क्विंटल मागे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिच्या कांद्याला ४५०० ते ५५०० हजारांचा भाव मिळाला आहे. तर निम्न प्रतिचा कांदा हा १५०० ते ३००० हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. हाच कांदा बाजार समितीतून व्यावसायिकांनी खरेदी केल्यानंतर त्याची दामदुप्पट म्हणजे ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसाने कांद्याचा पेरा खराब झाला आहे. अतिपावसाने कांदे सडत असल्याची परिस्थिती आहे. परतीच्या पावसाने सुद्धा कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची कैफियत शेतकऱ्यांची आहे. त्याचे परिणाम सर्वच बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीमंडीवर झाला असून, मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लाल व पांढऱ्या कांद्याला शासकीय दर ४५०० ते ५५०० रूपये क्विंटल मिळत असल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला आहे. व्यावसायिक दामदुप्पट भावाने विक्री करून ग्राहकांची लूट करीत आहेत. त्यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. पांढरा व लाल कांद्याची अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीमंडीत किमान रोज ३० ते ४० टन कांद्याची आवक होत आहे. सोलापूर व कर्नाटक राज्यातून कांदा बाजार समितीत येत आहे. परतीचा पाऊस लांबला असला तरी जुना कांदा आता बाजारपेठेतून हद्दपार झाला आहे. नवीन कांद्याचे उत्पादन ऑक्टोंबर महिन्यात येते. मात्र आलेला नवा कांदा पावसाने सडत असल्याने मागणीच्या तुुलनेत आवक कमी झाली आहे. किमान १ जानेवारीपर्यंत कांदा महागच राहणार असल्याचा अंदाज कांदा ठोक व्यापारी सतीश कावरे यांनी वर्तविला आहे. कांद्याचे भाव २० नोव्हेंबरपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज यापूर्वी त्यांनी वर्तविला होता तो खरा ठरला आहे. यानंतरही भाववाढ कायम राहणार आहे. किमान १ जानेवारी पर्यंत खासगी बाजारात कांदा ६० ते ८० रूपये राहणार असून, शेतकºयांच्या चांगल्या प्रतिच्या कांद्याला पाच हजार रुपये क्विंटलचा भाव कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पावसाने कांदा सडत असल्याने आवक कमी होत आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल ५५०० रूपयांचा भाव मिळाला आहे. गृहिणींना १ जानेवारीपर्यंत कांदा महागच खरेदी करावा लागणार आहे.
- सतीश कावरे,
कांदा व्यापारी अमरावती

टॅग्स :onionकांदा