शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आता खासगी एजन्सी करणार पाणी बिल वसुली

By admin | Updated: July 1, 2015 00:37 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आता पाणी बिलांची वसुली खासगी एजन्सीमार्फत करणार आहे.

वसुली वाढविण्याचे प्रयत्न : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा निर्णय वैभव बाबरेकर अमरावतीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण आता पाणी बिलांची वसुली खासगी एजन्सीमार्फत करणार आहे. वसुली वाढविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शहरात सुमारे ८० हजार ग्राहक असून दरवर्षी ३० कोटींच्या जवळपास वसुली केली जाते. आतापर्यंत ग्राहकांवर जवळपास २० कोटींची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. जीवन प्राधिकरणचे उत्पन्न व खर्च बघता दोन्ही जवळपास सारखेच असल्याचे निदर्शनास आले आहे. जीवन प्राधिकरणचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन पाणीमीटरचे रिडिंग घेतात. मात्र, त्या तुलनेत वसुली कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता खासगी एजन्सीमार्फत रिडिंग व वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी एजन्सीज जीवन प्राधिकरणने दिलेल्या नियमावलीनुसार मीटर रिडिंग व वसुली करणार आहे. आतापर्यंत केवळ रिडिंग घेऊन ग्राहकांना बिले पाठविण्यात येत होती. मात्र, आता विद्युत मीटरप्रमाणेच पाणीमीटरचे छायाचित्र काढण्याचे निर्देश खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच खासगी एजन्सीमार्फत बिल रिडिंग व वसुली सुरु करण्यात येणार आहे. पाणी बिलांची मुद्दल नागरिकांनी भरल्यास बिलावरील व्याज माफ करणारी निर्भय योजना ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे.