शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मुलीची आत्महत्या नसून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

निवेदनानुसार, वरूड तालुक्यातील जामगाव (खडका) येथील अरुण काळे यांची मुलगी पूनम हिचा विवाह सन २००८ मध्ये संजय बाबाराव ठाकरे याच्याशी झाला होता. तिला अपत्यप्राप्ती नसल्यामुळे संजय ठाकरे, सासू उषा ठाकरे, दीर विनोद ठाकरे, प्रमोद ठाकरे, रेखा ठाकरे, दामिणी विनोद ठाकरे व गौरव विनोद ठाकरे हे तिला सतत त्रास देत होते व भांडण उकरून काढत असल्याचे ती आमच्याकडे नेहमीच सांगत होती.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करा । पित्याची मागणी, पोलीस अधीक्षक ते गृह मंत्रालयाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौंडण्यपूर येथील विवाहितेला अपत्य होत नसल्याच्या कारणावरून सासरकडच्या मंडळीकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. १२ ऑक्टोबरला विषारी द्रव्य पाजून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप वडील अरुण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. परंतु, कुऱ्हा पोलिसांनी अद्याप कार्यवाही केली नाही. माझ्या मुलीची आत्महत्या नसून, खून झालेला असल्याने आरोपींविरुद्ध त्यासंबंधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनानुसार, वरूड तालुक्यातील जामगाव (खडका) येथील अरुण काळे यांची मुलगी पूनम हिचा विवाह सन २००८ मध्ये संजय बाबाराव ठाकरे याच्याशी झाला होता. तिला अपत्यप्राप्ती नसल्यामुळे संजय ठाकरे, सासू उषा ठाकरे, दीर विनोद ठाकरे, प्रमोद ठाकरे, रेखा ठाकरे, दामिणी विनोद ठाकरे व गौरव विनोद ठाकरे हे तिला सतत त्रास देत होते व भांडण उकरून काढत असल्याचे ती आमच्याकडे नेहमीच सांगत होती. परंतु, आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता पूनमने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे संजय ठाकरेने फोनद्वारे कळविले. रात्री १२ वाजता लहान जावई, मुलगी, पत्नी व मुलगा यांच्यासह अरुण काळे हे रात्री १२ वाजता अमरावती येथे इर्विन रुग्णालयात पोहोचले. तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.
अंत्यविधी आटोपल्यानंतर १३ ऑक्टोबरच्या रात्री पहाटे ४ वाजता कुऱ्हा पोलीस ठाण्यात अरुण काळे यांनी तक्रार दिली. तेव्हापासून या प्रकरणात काहीही कार्यवाही झालेली नाही. सासरच्या मंडळीवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी अरूण काळे यांनी २३ नोव्हेंबर रोजी देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू