शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीत जागा मिळेना, खुल्या जागेवर अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST

कोरोना संसर्ग, सारी, दमा अशा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी गॅस दाहिनी प्रकल्पात करण्यात येत आहे. गॅस दाहिनीत एका मृतदेहासाठी  किमान दोन तास लागतात. मृतदेहांची संख्या वाढत असल्याने गॅस दाहिनीत अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बरेचदा प्रतीक्षा सोयीची ठरत नसल्याने अंत्यविधी खुल्या जागेवर करण्यात येत असल्याची माहिती प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी दिली.

ठळक मुद्देशुक्रवारी २६, क्षमतेपेक्षा अधिक मृतदेह, कोविड-सारी आजाराने दगावण्याचे प्रमाण वाढले

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना महामारीचे संकट गहिरे होत आहे. शहरात दरदिवशी कोविड, सारी व इतर आजारांनी ८ ते १३ व्यक्ती दगावत आहेत.  परिणामी अंत्यविधीसाठी हिंदू स्मशान संस्थेच्या प्रशासनावर ताण येत आहे. ओटे उपलब्ध नसल्यास खुल्या जागेवर मृतदेहाचे अंत्यविधी सोपस्कार आटोपले जात आहेत. शुक्रवारी एकूण २६ मृतदेहांवर अंत्यविधी पार पडले. कोरोना संसर्ग, सारी, दमा अशा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी गॅस दाहिनी प्रकल्पात करण्यात येत आहे. गॅस दाहिनीत एका मृतदेहासाठी  किमान दोन तास लागतात. मृतदेहांची संख्या वाढत असल्याने गॅस दाहिनीत अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बरेचदा प्रतीक्षा सोयीची ठरत नसल्याने अंत्यविधी खुल्या जागेवर करण्यात येत असल्याची माहिती प्रबंधक एकनाथ इंगळे यांनी दिली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी स्मशानभूमीची पाहणी केली असता, हेच चित्र निदर्शनास आले. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता कोरोना, सारी व इतर आजाराने दगावलेले १६ रुग्ण, तर नैसर्गिकरीत्या दगावलेल्या १० जणांचा अंत्यविधी आटोपला. 

एप्रिलमध्ये १५ दिवसांत कोरोनाचे ७५ बळीएप्रिल महिन्यात कोरोनाने ७५ बळी घेतले. यात १ ते १५ एप्रिलपर्यंतचा समावेश आहे. मृतांमध्ये तरुणांचाही समावेश असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. १ ते ९ एप्रिल दरम्यान एक अंकी, तर १० ते १५ एप्रिल दरम्यान कोरोनाने बळींचा आकडा दोन अंकी झाला. शुक्रवारी तिघांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले असले तरी येथील हिंदू स्मशानभूमीत १६ कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

शुक्रवारी ६८० संक्रमित, तिघांचा मृत्यूशुक्रवारी ६८० कोरोना संक्रमित निष्पन्न झाले, तर गत २४ तासांत तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ८४९ नमुने तपासणी करण्यात आले. आतापर्यंत ५५,१७७ रुग्ण संक्रमित झाले आहेत. १५१० उपाचारार्थ दाखल आहेत. दिवसभरात १०१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत ५०,२६१ जणांनी कोरोनावर मात केली. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात ६९२, तर ग्रामीण भागात १९६२ रुग्ण आहेत. कोरोनाचे आतापर्यंत ७५२ बळी झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ४,१५४, रिकव्हरी रेट ९१.०९ टक्के आहे.

लाकूड ओले, सरण जळण्यास विलंब

हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. ओट्यांची संख्या तोकडी आहे. त्यातच लाकूड ओले असल्याने आधी जमिनीवर डिझेल टाकावे लागते. त्यानंतर सरण जळते. त्यातही बराच वेळ लागतो, असे मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या