शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन सोयाबीन बाजारात दाखल

By admin | Updated: September 22, 2015 00:18 IST

सतत ३ ते ४ वर्षांपासून अस्मानी संकट व शासनाच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या रसातळला गेलेल्या शेतकऱ्यांची आस ...

शासनाचे हमीभावाने शेतकऱ्याची थट्टा : एका वर्षात ४० रुपयांनी वाढसुमित हरकूट  चांदूरबाजारसतत ३ ते ४ वर्षांपासून अस्मानी संकट व शासनाच्या धोरणामुळे आर्थिकदृष्ट्या रसातळला गेलेल्या शेतकऱ्यांची आस यावर्षीदेखील नैसर्गिक अकृपेमुळ वाया जात असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना आधार देणारे नगदी पीक सोयाबीन आता हाती येऊनदेखील होणाऱ्या सोयाबीनच्या उत्पन्नाची टक्केवारी पाहता त्याला आलेला खर्च निघणार की नाही या विवंचनांमध्ये सापडलेला असताना स्थानिक बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभमुहूर्त करण्यात आले. या शुभमुहूर्तावर शेतकऱ्याला ३३५१ रुपये क्विंटल भाव मिळाले असले तरी होणाऱ्या उत्पन्नाला बघता खर्च निघनेही कठीण होत असल्याचे दिसत आहे. स्थानिक बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीच्या शुभमुहूर्तावर ब्राह्मणवाडा थडी येथील शेतकरी शरद जयपुरे यांनी आणलेले नवीन सोयाबीन सर्वप्रथम नवनिर्वाचित संचालक तथा अडते अमोल लंगोटे यांच्याकडे आल. या सोयाबीनला ३३५१ रुपये भाव देऊन स्थानिक व्यापारी पंकज नांगलिया, सुरेश नांगलीया, नीलेश चौधरी यांनी खरेदी केले. यावेळी बाजार समितीचे सचिव मनीष भारंबे यांनी सोयाबीनचे पूजन करुन शेतकरी शरद जयपुरे यांना टोपी, नारळ, दुपट्टयाने गौरविले. यावर्षी सोयाबीन आवक कमी राहणार अशी चर्चा व्यापारी वर्गामध्ये होती. तालुक्यातील सोयाबीनचे पीक पाण्याअभावी पिवळे पडत आहे. तालुक्यात सर्विकडेच सोयाबीनची शेंगा भरत असतानाच हे पीक रोगामुळे नष्ट झाले आहे. शासनातर्फे गतवर्षी सोयाबीनचे हमीभाव हे २५६० रुपये होेते. यामध्ये फक्त ४० रुपयांची किरकोळ वाढ करून यावर्षी २६०० रुपये शासनाने हमी भाव दिले. हे भाव एक तऱ्हेने शेतकऱ्यांची थट्टा करणारेच असल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी केले आहे.दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे चढ्या दराने भाव मिळतात, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन हे चांदूरबाजार समितीत विक्रीस आणावे.- मनीष भांरबे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती.