शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रात्री ११ वाजेपर्यंत फडकला शाळेत राष्ट्रध्वज

By admin | Updated: May 3, 2015 00:29 IST

दस्तूर नगरातील महापालिका शाळेत रात्री ११ वाजेपर्यंत राष्ट्रध्वज उतरविण्यात न आल्याने दोन मुख्याध्यापकांविरुध्द.....

दस्तूर नगरातील महापालिका शाळेतील घटना : दोन मुख्याध्यापकांविरुद्ध तिरंगा अवमानाचा गुन्हा दाखलअमरावती : दस्तूर नगरातील महापालिका शाळेत रात्री ११ वाजेपर्यंत राष्ट्रध्वज उतरविण्यात न आल्याने दोन मुख्याध्यापकांविरुध्द फे्रजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रफुल विजय अनिलकर (२८,रा.अमरनगर) व कविता उदयसिंग चव्हाण (३८,रा.जयंत कॉलनी) अशी, मुख्याध्यापकांची नावे आहेत. महापालिकेच्या मराठी शाळा क्रमांक ११ व हिन्दी शाळा क्रमांक १३ मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. दोन्ही शाळांची इमारत एकच असल्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडून सकाळी ७ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. इत्तमगावात ध्वजारोहण झालेच नाहीइत्तमगाव या शहिदांच्या भूमीत ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण झालेच नाही. याबाबत पंचायत समिती प्रशासनाला माहिती असतानासुध्दा दुर्लक्ष केले गेले. इत्तमगाव ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिनाला सचिव आणि प्रशासकाने ध्वजारोहण केले नाही. याबाबत तरुणांनी सचिवाला माहिती दिली. पण माझ्याकडे चार ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने हे शक्य होत नसल्याचे सांगून बोळवण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाला ध्वजारोहन आणि ग्रामसभा घेण्यात येणार असल्याची मुनादी देण्यात आली होती. १ मे रोजी सकाळी ग्रामवासी कार्यालयात आले. मात्र सचिव आणि प्रशासक अनुपस्थित असल्याने ध्वजारोहण झालेच नाही.ग्रामपंचायत, सेवा सोयायटीने केला अवमानभिलोना येथील ग्रामपंचायत व सेवा सोयायटीकडून १ मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, सायंकाळी ६ वाजेपर्यंत राष्ट्रध्वज उतरविण्यात आला नाही. रात्रभर राष्ट्रीय ध्वज फडकत राहिल्याचे लक्षात येताच पथ्रोट पोलिसांनी ग्रामसेवक अवघड, चपराशी खेडकर व सेवा सहकारी सोसायटीचे सचिव रहाटे यांच्याविरुध्द ध्वज अवमानाचा गुन्हा दाखल केला. बीट जमादार संजय इंगळे, अवधूत सगणे व पुरुषोत्तम माकोडे यांनी ही कारवाई केली.